घरताज्या घडामोडीKarjat Nagar Panchayat Election Result 2022 : रोहित पवारांची कर्जतमध्ये बाजी, राम...

Karjat Nagar Panchayat Election Result 2022 : रोहित पवारांची कर्जतमध्ये बाजी, राम शिंदेंना मोठा धक्का

Subscribe

नगरपंचायत निवडणुकीचा पहिला निकाल अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतमधून (Karjat Nagar panchayat result) आला आहे. कर्जतमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकहाती सत्ता मिळवली आहे. कर्जकमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांच्यात प्रतिष्ठेची लढत होती. कर्जतमध्ये १२ जागांवर राष्ट्रवादीचा विजय झाला आहे. तर भाजपचा एका जागेवर विजय झाला आहे. माजी मंत्री असलेल्या राम शिंदेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात अतिशय चुरशीची लढत म्हणून या लढतीकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते.

एकुण १७ पैकी १२ जागांवर राष्ट्रवादीने सरशी घेतली असल्याची आकडेवारी समोर येत आहे. तर भाजपला मात्र अवघ्या २ जागांवर समाधान मानावे लागले आहे. कर्जतमध्ये रोहित पवार विरूद्ध राम शिंदे अशी प्रतिष्ठेची लढत झाली होती. याठिकाणी दोन्ही पक्षाच्या नेत्यांपासून ते कार्यकर्त्यांनी या निवडणुकीसाठी तळ ठोकला होता. या निवडणूकीमध्ये आरोप प्रत्यारोपही मोठ्या प्रमाणात झाल्याचे पहायला मिळाले. राज्यातील नगर पंचायतीच्या निकालांमध्ये या दोन प्रमुख नेत्यांमधील लढतीमुळेच ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. या निकालाकडे राज्यातील नेत्यांचे आणि राजकीय पक्षांचेही लक्ष लागले होते.

- Advertisement -

राज्यातील विविध जिल्ह्यांमधील ९३ नगरपंचायतींमधील ३३६ जागांसाठी १८ जानेवारीला पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत सरासरी ८१ टक्के मतदान झाल्याची आकडेवारी समोर आली होती. त्यानंतरच अहमदनगरच्या कर्जत नगरपंचायतीचा निकाल हा राज्यात सर्वात पहिल्यांदा समोर आला. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाजी मारल्याची आकडेवारी समोर आली आहे.

कर्जत नगरपंचायत निवडणुकीसाठी एकुण ८० टक्के मतदान झाले होते. तर मतदानानंतरच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून त्याठिकाणी जल्लोष केला होता. त्यामुळे विजयाचा अंदाज राष्ट्रवादीला आधीच आला होता असे बोलले जात आहे.

- Advertisement -

मतदानाच्या दिवशी आमदार रोहित पवार आणि राम शिंदे यांनी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रानजीकच कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. या निवडणूकीच्या निमित्ताने कर्जतमध्ये दावे आणि प्रतिदावे झाले होते. त्यामुळेच ही लढत अतिशय चुरशीची झाली होती. आतापर्यंतच्या निकालानुसार कर्जत नगर पंचायतीच्या निकालात राष्ट्रवादी कॉंग्रेसची सरशी दिसत आहे.

कर्जत नगर पंचायत निकाल

निकाल-
भाजप-2
राष्ट्रवादी- 12
काँग्रेस- 3


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -