घरमहाराष्ट्रराष्ट्रवादीची 'शिवस्वराज्य यात्रा' आजपासून पुन्हा सुरु

राष्ट्रवादीची ‘शिवस्वराज्य यात्रा’ आजपासून पुन्हा सुरु

Subscribe

१९ ते २६ ऑगस्टपर्यंत असणार शिवस्वराज्य यात्रा

महाराष्ट्रात पूरपरिस्थितीमुळे तुर्तास स्थगित करण्यात आलेली राष्ट्रवादी काँग्रेसची ‘शिवस्वराज्य यात्रा’ सोमवारपासून म्हणजेच आजपासून पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. औरंगाबादमधील पैठण येथे संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेवून शिवस्वराज्य यात्रेची आज सुरुवात करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, डॉ. अमोल कोल्हे यांनी यावेळी संत एकनाथ महाराज यांच्या समाधी स्थळावर जावून दर्शन घेतले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार विक्रम काळे, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, माजी आमदार संजय वाकचौरे, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण आदींसह पैठण तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -

सांगली, कोल्हापूर, सातारा आणि कोकणात पुरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची ६ ऑगस्टला सुरु झालेली शिवस्वराज्य यात्रा नाशिक जिल्ह्यात बागलाण येथे स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पुरग्रस्तांना मदत करण्यास उतरली होती. अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला जात आहे. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुरग्रस्तांना मदतीचा हात देत त्यांना दिलासाही दिला. १९ ते २६ ऑगस्टपर्यंत ही शिवस्वराज्य यात्रा असणार आहे.


हेही वाचा – ईडीच्या नोटीशीला मनसे भीक घालत नाही – मनसे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -