घरताज्या घडामोडीमोहिते पाटलांना राष्ट्रवादीचा दणका; झेडपीत ६ सदस्यांचे निलंबन

मोहिते पाटलांना राष्ट्रवादीचा दणका; झेडपीत ६ सदस्यांचे निलंबन

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेले पण भाजपासाठी कार्यरत असणाऱ्या झेडपीत सहा सदस्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेले पण भाजपासाठी कार्यरत असणारे आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजपा प्रवेशानंतर सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपसाठी काम करणाऱ्या राष्ट्रवादीच्या सहा सदस्यांचे निलंबन करण्यात आले आहे. शुक्रवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीचे काँग्रेसच्या विरोधात मतदान करणाऱ्या सहा सदस्यांना पक्षाने निलंबित केले आहे. निलंबित केलेल्या सदस्यांमध्ये माळशिरस तालुक्यातील मंगल किरण वाघमोडे (रा. संग्रामनगर), शीतलदेवी धैर्यशील मोहिते-पाटील (रा. अकलूज), सुनंदा बाळासाहेब फुले (रा. यशवंतनगर), अरुण बबन तोडकर (रा. म्हाळुंग), स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील (रा. बोरगाव), गणेश महादेव पाटील (रा. पिलीव) यांचा समावेश आहे.

एकेकाळी जिल्ह्याच्या राजकारणात एकहाती वर्चस्व असलेल्या मोहिते – पाटील कुटुंबातील दोन सदस्यांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी हा निर्णय घेतला असल्याचे समोर आले आहे. तर माळशिरस तालुक्यातील स्वरूपाराणी मोहिते-पाटील, शीतलदेवी धैर्यशील मोहिते-पाटील या सदस्यांचा यात समावेश आहे.

- Advertisement -

अशी पार पडली निवडणुक

झेडपी अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव असून अध्यक्षपदासाठी माजी आमदार नारायण पाटील समर्थक सदस्य अभिमन्यू कांबळे यांना भाजप समविचारी आघाडीने निवडणुकीसाठी पुढे केले होते. तर, उपाध्यक्ष पदासाठी समाधान अवताडे गटाचे दिलीप चव्हाण यांना पुढे करण्यात आले होते. दरम्यान, निवडणुकीवेळी एकूण ६७ सदस्यांपैकी ६६ सदस्य हजर होते. त्यामुळे बहुमतासाठी ३४ सदस्यांची गरज होती. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे सदस्य त्रिभुवन धाईजे आणि उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे विक्रांत पाटील उभे होते. तसेच हात उंचावून मतदान झाले. त्यात भाजप समविचारी आघाडीचे कांबळे ३७ मत मिळवून अध्यक्षपदाच्या आणि चव्हाण ३५ मते मिळवून उपाध्यक्ष निवडणुकीत विजयी झाले आहेत.


हेही वाचा – जालना : प्रसिद्ध उद्योगपती राजेश नहार यांच्यावर गोळीबार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -