घरताज्या घडामोडीमहामार्गावरून गाडी नेण्यापूर्वी FASTagबाबतची ही माहिती जाणून घ्या, अन्यथा भरावा लागेल दंड

महामार्गावरून गाडी नेण्यापूर्वी FASTagबाबतची ही माहिती जाणून घ्या, अन्यथा भरावा लागेल दंड

Subscribe

चारचाकी वाहन चालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एखाद्या वाहनचालकाकडे FASTag नसेल किंवा वाहनावर लावलेला FASTag काम करत नसल्यास त्या वाहनचालकाला टोल प्लाझावर दुप्पट टोल फी भरावा लागणार आहे. याबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने (NHAI) माहिती दिली.

चारचाकी वाहन चालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एखाद्या वाहनचालकाकडे FASTag नसेल किंवा वाहनावर लावलेला FASTag काम करत नसल्यास त्या वाहनचालकाला टोल प्लाझावर दुप्पट टोल फी भरावा लागणार आहे. याबाबत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने (NHAI) माहिती दिली. दरम्यान, सदोष FASTags बद्दल कोणतीही माहिती नाही आणि महामार्ग टोल प्लाझावर FASTags कार्य न केल्याबद्दल वाहनचालकांकडून दंड वसूल केला जातो, अशीही माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने दिली. (nhai told about non working fastag fine and penalties collected at toll plazas)

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) दिलेल्या माहितीनुसार, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) टॅग असूनही सदोष FASTag प्रकरणांची संख्या आणि वापरकर्त्यांकडून वसूल केलेल्या दंडाच्या एकूण रकमेबद्दल कोणतीही माहिती नाही. तसेच, 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत 6 कोटींहून अधिक फास्टॅग जारी करण्यात आले आहेत.

- Advertisement -

माहिती अधिकार कायद्यांतर्गत पीटीआयने दाखल केलेल्या अर्जाला उत्तर देताना भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने म्हटले होते की 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत एकूण 60,277,364 फास्टॅग जारी करण्यात आले आहेत. आरटीआयच्या प्रश्नांना उत्तर देताना NHAI म्हणाले, “असा कोणताही डेटा उपलब्ध नाही. NHAI शुल्क प्लाझासाठी NPCI डेटानुसार 16 फेब्रुवारी 2021 ते 16 एप्रिल 2022 पर्यंत FASTag द्वारे गोळा केलेला एकूण टोल 39,118.15 कोटी आहे. तसेच, NHAI शुल्क प्लाझासाठी आर्थिक वर्ष 2022 मध्ये एकूण टोल संकलन 34,535 कोटी रुपये होते.

दरम्यान, सरकारने गेल्या वर्षी 16 फेब्रुवारीपासून सर्व खासगी आणि व्यावसायिक वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य केले आहे. या अंतर्गत, ज्या वाहनांकडे वैध किंवा कार्यक्षम FASTag नाही त्यांना दंड म्हणून दुप्पट टोल फी भरावी लागेल. त्याच वेळी, वापरकर्त्यांच्या तक्रारी आहेत की काहीवेळा FASTags टोल प्लाझावर योग्यरित्या काम करत नाहीत, ज्यामुळे त्यांना टोल प्लाझावर दुप्पट पैसे द्यावे लागतात. सध्या 24 बँकांकडून FASTag जारी केला जातो.

- Advertisement -

हेही वाचा – पीक कर्जासाठी ‘सीबील’ची सक्ती! मुजोर बँकांना समज देत शेतकऱ्यांना कर्ज द्यावे – अजित पवार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -