घरताज्या घडामोडीNitesh Rane: नितेश राणेंना आठवड्यातून एकदा पोलीस स्टेशनची हजेरी सक्तीची, ...

Nitesh Rane: नितेश राणेंना आठवड्यातून एकदा पोलीस स्टेशनची हजेरी सक्तीची, कणकवलीत प्रवेशबंदी

Subscribe

सिंधुदुर्ग जिल्हा बैंक निवडणूकी च्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक संतोष परब यांच्या वर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. संतोष परब यांच्या वर कणकवलीमध्ये खुनी हल्ला झाला होता. या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आमदार नितेश राणे यांना न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

Nitesh Rane grant bail : भाजप आमदार नितेश राणे यांना संतोष परब हल्ला प्रकरणात अटक करण्यात आली होती. राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केलेल्या नियमित जामीन अर्जावर मंगळवारी सुनावनी झाली आणि जिल्हा व सत्र न्यायाधीश एसव्ही हांडे यांनी नितेश राणेंचा सशर्त जामीन मंजूर केला. जामीन मंजूर झाला असला तरी चार्ज शीट दाखल होईपर्यंत नितेश राणे यांना आठवड्यातून एकदा कणकवली पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नितेश राणेंना कणकवलीमध्ये प्रवेशबंदी असणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बैंक निवडणूकी च्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक संतोष परब यांच्या वर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. संतोष परब यांच्या वर कणकवलीमध्ये खुनी हल्ला झाला होता. या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या आमदार नितेश राणे यांना न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

आमदार नितेश राणे व त्यांचे खाजगी स्वीय सहाय्यक राकेश परब यांना शुक्रवारी न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर त्यांचे वकील संग्राम देसाई यांनी तात्काळ जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने अर्ज दाखल करून घेतल्यानंतर वकील संग्राम देसाई यांनी आपली बाजू मांडली होती. त्यावर न्यायालयाने शनिवारी दुपारी यावर सुनावणी घेऊन निर्णय देण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानुसार आमदार राणेंचे वकील सतीश मानेशिंदे, संग्राम देसाई शनिवारी दुपारी न्यायालयात हजर झाले होते. परंतु या प्रकरणी शासनाने नियुक्त केलेले विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी ई-मेलद्वारे अर्ज करीत बचाव पक्षाच्यावतीने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या न्यायालयात जो अर्ज दाखल केलेला आहे. त्या अर्जावर या न्यायालयात ही सुनावणी न घेता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात घेण्याची मागणी केली होती. परंतु सरकारी वकील घरत यांनी केलेल्या अर्जावर स्वाक्षरी नव्हती. तो विहित नमुन्यात नव्हता. त्यामुळे हा अर्ज फेटाळण्याची मागणी राणे यांच्या वकिलांनी केली.

त्यानंतर सायंकाळी ४ वाजेपर्यंत अर्ज परिपूर्ण करण्यास मुदत देण्यात आली होती. तरीही वकील घरत यांनी त्रुटी दूर केल्या नाहीत. त्यानंतर हा अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयात देण्यात आला. यावेळी या न्यायालयाने जामीन अर्जावर सोमवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होईल. तसेच विशेष सरकारी वकिलांनी दिलेल्या अर्जातील त्रुटी दूर करण्यास सोमवारी दुपारी २ वाजेपर्यंत वेळ दिला होता. दरम्यान लता मंगेशकर यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दुखवटा जाहीर करण्यात आला. सोमवारी सार्वजनिक सुट्टी राज्य सरकारने जाहीर केली. त्यामुळे ही सुनावणी मंगळवारी घेण्यात आली.  सुनावणी पूर्ण झाल्यावर निकाल बुधवारी देण्याचे ज़ाहीर केले.  त्यानंतर आज बुधवारी न्यायालयाने निकाल दिला असून आमदार नितेश राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Nitesh Rane : नितेश राणेंची तब्येत आणखी खालावली, उलट्यांचा त्रास सुरु; आज…

Nitesh Rane:  नितेश राणेंना आठवड्यातून एकदा पोलीस स्टेशनची हजेरी सक्तीची,  कणकवलीत प्रवेशबंदी
Tejasvi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejasvi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -