घरक्राइमदोन महिने उलटूनही नोटिसांवर कारवाई शून्य; ‘एनएमआरडीए’च्या कारभारावर संशय

दोन महिने उलटूनही नोटिसांवर कारवाई शून्य; ‘एनएमआरडीए’च्या कारभारावर संशय

Subscribe

त्र्यंबक रस्त्यावर अनधिकृत लॉजिंगचा विषय गेल्या काही दिवसांपासून गंभीर बनला असताना नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(एनएमआरडीए)च्या अधिकार्‍यांकडून अनधिकृत बांधकाम करणार्‍या लॉजधारकांना पाठीशी घालण्याचा धक्कादायक प्रकार होताना दिसून येत आहे. लॉजधारकांना दिलेल्या नोटिसांसंदर्भात माहिती मागितली असता येथील अधिकार्‍यांकडून माहितीची दडवादडवी सुरू केल्याने अधिकारी संशयाच्या भोवर्‍यात अडकले आहेत. वास्तविक, सामाजिक हित जोपासण्याच्या दृष्टीने ही माहिती उघडकीस येणे आवश्यक असताना या गंभीर प्रकाराची माहिती दडवून अधिकारी आपल्यात अकार्यक्षमतेचा पुरावा देत असून, माहिती दडविण्यामागे लॉजचालकांशी काही ‘अर्थपूर्ण’ संबंध प्रस्थापित झाले आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

त्र्यंबक रस्त्यावरील लॉजिंगमध्ये सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायाला ’आपलं महानगर’ ने वाचा फोडल्यानंतर सर्वच शासकीय यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या आहेत. एकीकडे पोलीस लॉजचालकांना गुन्हे दाखल करण्याचे इशारा देत असताना दुसरीकडे मात्र ‘एनएमआरडीए’कडून लॉजधारकांना अभय मिळत असल्याचे दिसून येत आहे. शासनाची कुठलीही परवानगी न घेता लॉज आणि रिसॉर्टचे बांधकाम करणार्‍यांना गेल्या काही दिवसांपूर्वी ‘एमएमआरडीए’ने नोटिसा बजावल्या आहेत. नोटिसा फेब्रुवारी २०२४ मध्ये बजावण्यात आल्या असून, त्यास आता दोन महिने झाले तरी अद्याप कुठलीही कारवाई न झाल्याने ‘एनएमआरडीए’च्या अधिकार्‍यांची भूमिका संशयास्पद असल्याचे स्पष्ट होत आहे.

- Advertisement -

या संदर्भातील अधिक स्पष्टता येण्यासाठी त्र्यंबक रस्त्यावर लॉज आणि रिसॉर्ट चालकांना दिलेल्या नोटिसांबाबत माहिती मागितली असता येथील माहिती अधिकारी आशिष सहाने यांनी आश्चर्यकारक उत्तरे देऊन माहिती देण्यास टाळाटाळ केली. मुळात माहिती अर्जात वर्गीकरण करून देणे, असे म्हटले नसताना सहाने यांनी दिलेल्या उत्तरात वर्गीकरणाचा जावई शोध लावून आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे दर्शन घडविले आहे. हा सर्वच प्रकार धक्कादायक असताना जनतेच्या डोळ्यात अक्षरशः धूळफेक केली जात आहे. कारवाई करायचीच नव्हती तर नोटिसांचा फोर्स कशासाठी लॉजधारकांशी काही ‘सेटलमेंट’झाली आहे का, असाही प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. लॉजचालकांच्या अनैतिक कृत्याला ‘एमएमआरडीए’चे छुपे समर्थन आहे का? असा सवाल विचारला जात आहे.

त्र्यंबक रस्त्यावरील बहुतांश लॉज हे शासनाच्या नाकावर टिच्चून बांधले आहेत. कुठलीही परवानगी न घेता अनेकांनी अनाधिकृत बांधकामे केली आहेत. काहींनी शासनाच्या जागेवरच लॉजिंग थाटले आहे तर काहींनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर लॉजिंग बांधले आहे. हा सर्वच प्रकार अतिशय धक्कादायक असताना जिल्ह्यात शासन नावाची यंत्रणा अस्तित्वात आहे का. असा सवाल उपस्थित होत आहे. त्रंबक रस्त्यावर आणि परिसरात बहुतांश ठिकाणी रिसॉर्ट आणि लॉजिंगचे बेकायदेशीर बांधकाम झालेले असून, शासनाचा कुठलाही वचक नसल्याने सर्वच अलबेल आहे.या सर्वांनाच ‘एनएमआरडीए’चे कवच कुंड लाभल्याचे अधोरेखित झाले आहे. याबाबत सर्वसामान्यांमध्ये मात्र संताप व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

n ‘आपलं महानगर’ ‘अनैतिकतेचे लॉजिंग’ मालिका सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भातील आपल्या प्रतिक्रिया ९०२२५५७३२६ या व्हॉट्स अ‍ॅप क्रमांकावर पाठवाव्यात.

‘एनएमआरडीए’ने लॉजधारकांना दिलेल्या नोटिसा वैयक्तिक स्वरूपाच्या असल्यामुळे अशी माहिती देता येत नाही.
– सतीशकुमार खडके, आयुक्त, नाशिक महानगर प्रदेश प्राधिकरण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -