घरमहाराष्ट्रआता राष्ट्रवादीला निमंत्रण

आता राष्ट्रवादीला निमंत्रण

Subscribe

काँग्रेसशी चर्चा करून निर्णय घेणार

शिवसेनेचा सरकार स्थापनेचा दावा आमदारांच्या संख्याबळा अभावी फसल्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोमवारी तिसरा मोठा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित केले. तसे पत्रही राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांना देण्यात आले. त्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आदी नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. आम्हाला मंगळवारी ८.३० वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

आमचा मित्र पक्ष काँग्रेससोबत चर्चा करून आम्ही सत्ता स्थापनेबाबत लवकरात लवकर राज्यपालांना कळवू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर पत्रकारांना सांगितले. राज्यपाल यांनी पत्र पाठवून राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांना सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले. राजकीय कोंडीवर मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईत सकाळी १० वाजता बैठक तर दिल्लीतही काँग्रेसची बैठक होणार आहे.

- Advertisement -

मुंबई8शिवसेनेचा सरकार स्थापनेचा दावा आमदारांच्या संख्याबळा अभावी फसल्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोमवारी तिसरा मोठा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित केले. तसे पत्रही राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांना देण्यात आले. त्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आदी नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. आम्हाला मंगळवारी ८.३० वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

आमचा मित्र पक्ष काँग्रेससोबत चर्चा करून आम्ही सत्ता स्थापनेबाबत लवकरात लवकर राज्यपालांना कळवू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर पत्रकारांना सांगितले. राज्यपाल यांनी पत्र पाठवून राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांना सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले. राजकीय कोंडीवर मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची मुंबईत सकाळी १० वाजता बैठक तर दिल्लीतही काँग्रेसची बैठक होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -