घरमहाराष्ट्रप्रेमविवाह न करण्याची शपथ देणारे तीन प्राध्यापक निलंबित

प्रेमविवाह न करण्याची शपथ देणारे तीन प्राध्यापक निलंबित

Subscribe

विद्यार्थिनींना१३ फेब्रुवारी रोजी प्रेमविवाह न करण्याची शपथ देण्यात आली होती. विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी, अमरावतीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाईचा बडगा उगारला आहे.

अमरावतीत महाविद्यालयीन विद्यार्थिनींना व्हॅलेंटाईन दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘मी प्रेमविवाह करणार नाही’ अशी शपथ देण्यात आली होती. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावर बरीच टीका झाली. याप्रकरणी अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. विद्यार्थिंना शपथ देण्याऱ्या तीन प्राध्यापकांना निलंबित करण्यात आले आहे. चांदुर येथील विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीद्वारे संचालित महिला कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेने १३ फेब्रुवारी रोजी टेंभुर्णा येथे शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात प्रेमविवाह न करण्याची शपथ देण्यात आली होती.

दरम्यान, विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी, अमरावतीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेतली. डॉ. नितीन धांडे यांनी संस्थेचे सचिव युवराजसिंग चौधरी यांच्या मार्फत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एस. हावरे, प्रा. डॉ. पी.पी. दंदे आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. व्ही. डी. कापसे यांना निलंबित केले आहे. यासह या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे.

- Advertisement -
काय घेतली होती शपथ?

“मी अशी शपथ घेते की, माझ्या आई वडिलांवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे समोर घडणाऱ्या घटना लक्षात घेता, मी प्रेम आणि प्रेमविवाह करणार नाही. यासह मी माझे लग्न हुंडा घेणाऱ्या मुलाशी करणार नाही. समजा सामाजिक परिस्थितीमुळे आज माझे लग्न माझ्या कुटुंबाने हुंडा देऊन केले, तर भावी पीढीतील एक माता म्हणून मी माझ्या होणाऱ्या सुनेकडून हुंडा घेणार नाही. तसेच मुलीसाठी हुंडा देणार नाही. एक कर्तव्य म्हणून मी शपथ घेते.”


हेही वाचा – फडणवीसांनी अजितदादांना मध्येच थांबवलं आणि ‘त्या’ शपथविधीचा गौप्यस्फोट टळला!

पंकजा मुंडेंनी व्यक्त केल्या होत्या भावना

“कॉलेजात मुलींना प्रेम आणि प्रेम विवाह न करण्याची शपथ देणे हा कमालीचा विचित्र प्रकार आहे. ही शपथ मुलींनाच का? आणि ती ही प्रेम न करण्याची…त्यापेक्षा मुलांनी शपथ घ्यायला हवी की, एकतर्फी प्रेमातून मुलींना त्रास देणार नाही. कोणावर अॅसिड फेकणार नाही, कुणाला जिवंत जाळणार नाही. कुणाकडे वाकड्या नजरेने बघणार नाही आणि जर कोणी बघितले तर त्याला चोख प्रत्युत्तर देईन,” अशा तीव्र भावना माजी महिला-बालकल्याण मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या होत्या.

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -