घरताज्या घडामोडीगृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल

Subscribe

जेएनयूतील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथील आंदोलनात सहभाग घेतल्याप्रकरणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेत तक्रार दाखल केली होती. आता या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हणून किरीट सोमय्यांची तक्रार दरम्यान गेट वे ऑफ इंडियाजवळ झालेल्या आंदोलनात ‘काश्मीर को चाहिए आझादी’ अशा घोषणा देण्यात आल्याने सोमय्या यांनी याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

“ठाकरे सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली अवैध आणि देशविरोधी ‘काश्मीर को चाहिए आझादी’ अशा घोषणा देण्यात आल्या. हे आंदोलन करण्यासाठी पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. तरीही हे आंदोलन करण्यात आले असून, मंत्र्यांविरोधात कारवाई करण्यात यावी,”, अशी मागणी सोमय्या यांनी तक्रारीत केली होती. अखेर पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत आव्हाडांवर गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -