घरताज्या घडामोडीकेंद्रीय मंत्री नितीन गडकरींना काळं फासण्याचा डाव?, हिंगणघाटच्या आमदारांची ऑडिओ क्लीप व्हायरल...

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना काळं फासण्याचा डाव?, हिंगणघाटच्या आमदारांची ऑडिओ क्लीप व्हायरल…

Subscribe

स्वतंत्र्य विदर्भाच्या मुद्द्यावरती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काळं फासण्याचा डाव एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून उघडकीस आला आहे. समुद्रपूर तालुक्यातल्या एका प्रवीण महाजन या व्यक्तीने हिंगणघाटचे भाजप आमदार समीर कुणावार यांना फोन केला होता. त्यावेळी आमदार कुनावाल यांनी असं कुठलंही चुकीचं पाऊल उचलू नका, असा सल्ला कुणावार यांनी प्रवीण महाजन या व्यक्तीला दिला आहे.

ऑडिओ क्लीपमध्ये काय म्हटलंय?

प्रवीण महाजन या व्यक्तीने हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांना फोन केला. त्यावेळी प्रवीण महाजन ही व्यक्ती म्हणाली की, आम्ही नितीन गडकरी यांच्याकडे आज संध्याकाळी निवेदन घेऊन येत आहोत. आमच्याकडून इतर काही अघटीत व्हावं. अशी गोष्ट करण्याचा विचार नाहीये. फक्त आम्ही शाई आमच्यासोबत घेऊन येऊ आणि हे निवेदन तुमच्या हस्ते त्यांच्याकडे देणार आहोत. विदर्भाच्या मागणीसाठी आम्ही त्यांना तोंडी सांगणार आहोत. मात्र, या सर्व गोष्टीनंतर हिंगणघाटे आमदार समीर कुणावार यांनी असं न करण्याचा सल्ला प्रवीण महानज यांना दिला आहे. तसेच निवडणुकीच्या तोंडावर असं करणही योग्य नाहीये. असं देखील कुणावार यांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल (रविवार) हिंगणघाट नगर परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात हिंगणघाटमधील विविध विकासकामांचे लोकार्पण केले. तसेच यावेळी खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार, रामदास आंबटकर तसेच इतर अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

दरम्यान, स्वतंत्र्य वदर्भासाठी जनतेचा आक्रोश असल्यामुळे हा रोश केंद्र सरकार पर्यंत आम्हाला दर्शवायचा आहे. अशी प्रविण महाजन यांची इच्छा आहे. परंतु हिंगणघाटचे भाजपाचे आमदार कुणावार यांनी असं काहीही करू नका, असा सल्ला महाजन यांना दिला आहे. सध्या ही ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आहे. त्यामुळे आता विरोधकांकडून डाव आखण्याचा प्रयत्न होतोय की काय? अशी चर्चा देखील होत असून प्रवीण महाजन यांच्यावर कारवाई होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा: ST workers strikes : एसटी कर्मचाऱ्यांना आज शेवटचा अल्टीमेटम, निलंबन रद्द करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -