घरमहाराष्ट्र'माय महानगर' you tube चॅनलचे १ लाख सबस्क्रायबर्स!

‘माय महानगर’ you tube चॅनलचे १ लाख सबस्क्रायबर्स!

Subscribe

‘आपल्या बातम्या, आतल्या बातम्या’ देणारे, गेल्या ३१ वर्षांची दीर्घ परंपरा असलेले दैनिक आपलं महानगरनेे सकारात्मक बदल केले आहेत. ‘आम्ही सांगतो पाणी कुठे मुरतंय’ हे सांगतानाच, नववाचकांना जोडण्यासाठी १९ जून २०१८ रोजी आपलं महानगरने, www.mymahanagar.com ही डिजिटल आवृत्ती सुरू केली. संकेतस्थळासोबतच माय महानगर फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि यु ट्यूब सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील उपलब्ध आहेे. यु ट्यूब हे व्हिडिओ स्वरुपात बातम्या देण्याचे नवमाध्यम माय महानगरने अतिशय खुबीने वापरल्याने माय महानगरच्या यु ट्यूब चॅनलने अल्पावधीत एक लाख सबस्क्रायबर्सचा टप्पा पार केला.

इतकंच नव्हेतर नव्या युगाचे व्यासपीठ मानले जाणार्‍या फेसबुकमध्ये माय महानगरचे तब्बल ५७ हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत, तर ३६ हजार लाईक्स आहेत. माय महानगरने स्थापनेपासूनच सर्व वयोगटातील वाचकांना नजरेसमोर ठेवून वेगवेगळ्या प्रकारचा मजकूर उपलब्ध करून दिला. राजकारण, मनोरंजन, लाईफस्टाईल, क्राईम, टीप्स आणि कसे कराल? अशा प्रकारच्या मजकूराला वाचकांनी चांगलीच पसंती दिली. वर्ष २०१८ आणि २०१९ मध्ये गणेशोत्सव काळात ‘लालबागचा राजा’च्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत २४ तास लाईव्ह दर्शन यु ट्यूबवर दिले.

- Advertisement -

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दीपावली तसेच इतर सणांचे औचित्य साधून माय महानगरच्या टीमने वाचकांना नवनवीन व्हिडिओजची मेजवानी दिली. व्हायरल व्हिडिओ, सीसीटीव्हीचे दृश्य अशा कटेंटलाही यु ट्यूबवर चांगली पसंती मिळाली. त्यामुळेच १ लाखाचा टप्पा सहज पार करता आला. आता सबस्क्रायबरची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाचक आणि प्रेक्षकांनी दाखवलेला विश्वास, तसेच ‘टीम महानगर’चे अविरत प्रयत्न यामुळे माय महानगरचे यु ट्यूब चॅनल लवकरच १० लाखांचा टप्पा पार करेल, असा विश्वास आहे. ‘कालाय तस्मै नम:’ अर्थात काळानुसार सकारात्मक बदल झाले तर नवे वाचक, प्रेक्षक जोडले जातात हे आपलं महानगर आणि माय महानगरने पुन्हा सिद्ध केले आहे. आगामी काळातही आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून जास्तीतजास्त वाचक, प्रेक्षकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न आपलं महानगर आणि माय महानगरचा असणार आहे. तेव्हा अपडेट बातम्यांसाठी लॉग इन करा www.mymahanagar.com

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -