घरठाणेधक्कादायक! ठाण्यात वयोवृद्धाचा शॉक लागून मृत्यु

धक्कादायक! ठाण्यात वयोवृद्धाचा शॉक लागून मृत्यु

Subscribe

ठाणे: उपवन येथे महावितरणच्या इलेक्ट्रिक डीपीमधून बाहेर आलेल्या एका लोखंडी पट्टीचा स्पर्श झाल्याने शॉक लागून कळंबोली येथील भाऊराव नारायण चव्हाण असे ६५ वर्षीय वयोवृद्ध ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याची मंगळवारी सकाळी पावणे सात ते सात वाजण्याच्या सुमारास समोर आली. मयत चव्हाण हे दुचाकी एका बाजूला करताना हा प्रकार घडला.

कळंबोली, कामोठे गावात राहणारे चव्हाण हे ट्रक चालक असून ते ट्रक घेऊन उपवन येथे सकाळीच आले होते. याचदरम्यान ते ट्रक वळवत असताना, ट्रकमधून खाली उतरून समोर असलेले दुचाकी बाजूला करण्यासाठी गेले असता, महावितरणच्या इलेक्ट्रिक डीपीमधून बाहेर आलेल्या एका लोखंडी पट्टीला त्यांचा स्पर्श झाल्यामुळे त्यांना शॉक लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

झाड कोसळले दोन दुचाकींवर

ठाण्यातील वसंत विहार येथील जास्मिन टॉवरच्या आवारातील झाड तेथे पार्क केलेल्या दोन दुचाकींवर कोसळल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास समोर आली. यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नसून पडलेले झाड कापून एका बाजूला करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी वृक्ष प्राधिकरण विभागाचे कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचाऱ्यांनी धाव घेतली होती.त्यांनी दुचाकींवर पडलेले झाड कापून बाजूला केले अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -