घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री गुंडाना संरक्षण देणार असतील तर दाद कोणाकडे मागावी, एकनाथ खडसेंचा सवाल

मुख्यमंत्री गुंडाना संरक्षण देणार असतील तर दाद कोणाकडे मागावी, एकनाथ खडसेंचा सवाल

Subscribe

मुंबई – मुख्यमंत्री गुंडांचे सरंक्षण करत असतील तर पोलिस तपास कसा करणार असा प्रश्न आमदार एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत केला. रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणाच्या तपासावरून खडसे सभागृहात बोलत होते. यावेळी त्यांनी ऑडिओ क्लिप पेनट्राइव्ह सभागृहात सादर केला.

एकनाथ खडसेंचे आरोप काय –

- Advertisement -

एकना खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांच्यावर डिसेंबर 2021 मध्ये काही अज्ञातांनी हल्ला केला होता. हा हल्ला करण्यामागे शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याच आरोप केला. या हल्ल्याचा तपासाचा मुद्दा एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. यावेळी रोहिणी खडसे यांच्यावर हल्ला झाला त्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण आतपर्यंत या प्रकरणाची चौकशी झाली नसल्याचे खडसे यांनी सांगितले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही चौकशी IPS अधिकाऱ्याकडे सोपवली होती. मात्र, पोलिसांनी उलट आरोपींना सहकार्य केल्याचा आरोप खडसे यांनी केला. यावेळी कलम 307 नुसार गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाट असल्याचे खडसे यांनी सांगितले.

एकनाथ खडसे मुख्यमंत्र्याबद्दल काय म्हणाले –

- Advertisement -

रोहिणी खडसे यांच्यावरील हल्ला प्रकरणातील आरोपींना तडिपार करण्याची नोटीस धाडण्यात आली होती. या नोटिसा रद्द करण्यात आल्या आहेत. एका महिलेवर हल्ला होतो आणि आरोपींना संरक्षण दिले जाते यापेक्षा दुसरं दुर्देव कोणते, अशी नाराजी खडसे यांनी व्यक्त केली.अशा गुंडाना मुख्यमंत्री संरक्षण देणार असतील तर दाद कोणाकडे मागावी असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आपल्या आरोपांबाबतचा व्हिडिओ आणि ॲाडिओ क्लिपचा पेन ड्राईव्ह एकनाथ खडसे यांनी सभागृहात सादर केला. खडसे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर आपण लिखीत उत्तर देणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -