घर उत्तर महाराष्ट्र मुक्त शिक्षणही महागले; मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक शुल्कात वाढ, आणखीही काही अटी

मुक्त शिक्षणही महागले; मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक शुल्कात वाढ, आणखीही काही अटी

Subscribe

नाशिक : नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने यंदाच्या शैक्षणिक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक शुल्कात भरमसाठ वाढ केली आहे. विद्यापीठाने बी. ए. आणि बी.कॉम. प्रथम वर्षाच्या शैक्षणिक शुल्क 1 हजार 702 वरून थेट 2 हजार 988 रूपये म्हणजेच तब्बल १२८६ रूपयांनी वाढ केली आहे. मुक्त विद्यापीठाच्या या धोरणामुळे राज्यातील लाखो गरीब विद्यार्थ्यांवर आर्थिक भुर्दंडाचा बोजा पडणार आहे.

ज्ञानगंगा घरोघरी ब्रीद घेऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी नाशिकचे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कार्यान्वित आहे. दरवर्षीं लाखो विद्यार्थी या विद्यापीठातून शिक्षण घेत आहेत. मात्र विद्यापीठाकडून वेगवेगळया अभ्यासक्रमासाठी असलेल्या शैक्षणिक शुल्कात 75 ते 80 टक्के फी वाढ करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या बीकॉम आणि बीए या दोन अभ्यासक्रमाला जवळपास 50 टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे राज्यातल्या अडीच ते 3 लाख विद्यार्थी प्रवेश घेतात. त्या दोन्ही अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक शुल्कामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.

- Advertisement -

मागील वर्षी बीए आणि बीकॉम प्रथम वर्ष प्रवेशासाठी 1702 रुपये शुल्क होते. यावर्षी मात्र 2988 विद्यार्थ्यांना मोजावे लागत आहे. फक्त ही याच दोन अभ्यासक्रमाची स्थिती नाही तर विद्यापीठाच्या प्रत्येक अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक शुल्कामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे. ही वाढ 75 टक्के असून याशिवाय बी. एस.सी. 55 टक्के, डी.सी.एम 35 टक्के आणि एम.ए. साठी 36 टक्के शैक्षणिक शुल्क वाढवण्यात आली आहे. इतर बीएससी, एमए, बीएसस्सी किंवा अशा अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक शुल्कामध्ये 35 ते 55 टक्के वाढ करण्यात आलेली आहे. एवढी मोठी शैक्षणिक शुल्कात वाढ झालेली असताना कोणत्याही विद्यार्थी संघटनेने, राजकीय पक्ष याच्यावर काही बोलायला तयार नाही. विशेष म्हणजे यावर्षीच्या आधी जी शैक्षणिक शुल्क भरण्याची मुभा होती, ती दोन टप्प्यांमध्ये होती. मात्र आता पहिल्यांदाच एकाच वेळी म्हणजेच ज्यावेळी विद्यार्थी प्रवेश घेतील, त्याचवेळी हे संपूर्ण फी भरण्याची सक्ती विद्यापीठाने केलेली आहे.

पाच वर्षात पहिल्यांदाच वाढ

मागील पाच वर्षात पहिल्यांदाच वाढ करण्यात आली असून अभ्यासक्रमानुसार फी भरण्याचे टप्पे ठरविण्यात आल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. इतर विद्यापीठांमध्ये शैक्षणिक शुल्क मुक्त विद्यापीठाच्या अधिक आहे. त्यामुळे पारंपरिक विद्यापीठांच्या तुलनेत विद्यापीठाने केलेली वाढ कमीच आहे. ही वाढ आता नाहीतर हे शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी झाली असून निवडक अभ्यासक्रमांसाठी असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -