घरताज्या घडामोडीनवी मुंबई : शिवसेना नेते विजय चौगुले यांना जीवे मारण्याची धमकी

नवी मुंबई : शिवसेना नेते विजय चौगुले यांना जीवे मारण्याची धमकी

Subscribe

शिवसेना नेते, महाराष्ट्र वडार मंडळाचे अध्यक्ष आणि मनपा विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांना खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबईत सध्या राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु आहे.

नवी मुंबईत एक खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. शिवसेना नेते, महाराष्ट्र वडार मंडळाचे अध्यक्ष आणि मनपा विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांना खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या तोंडावर अशी धमकी देण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

५० लाखांची खंडणी

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीकडून ५० लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. तसेच पैसे दिले नाहीतर जीवे मारु अशी, धमकी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही धमकी फोन वरुन नाहीतर पत्र पाठवून देण्यात आली आहे. याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अज्ञाताचा शोध घेत आहेत.

- Advertisement -

महिलांसोबतचे आक्षेपार्य फोटो व्हायरची धमकी

मिळालेल्या माहितीनुसार, विजय चौगुलेंचे महिलेंसोबतचे आक्षेपार्य फोटो असून हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जातील आणि ते होऊ नये, असे वाटत असल्यास ५० लाख रुपयांची खंडणी द्यावी, अशी धमकी देण्यात आली आहे. दरम्यान, फोटोंबाबत चौगुले यांना विचारणा केली असता, ‘माझे महिलांसोबत कोणतेही आक्षेपार्ह फोटो नाहीत’, असे स्पष्टीकरण चौगुलेंनी दिले आहे. ज्या पत्राद्वारे चौगुलेंना खंडणीची धमकी देण्यात आली ते पत्रदेखील पोलिसांनी तपासणीसाठी घेतले आहे. दरम्यान, याबद्दल अधिक माहिती काढण्यासाठी पोलीस चौगुले यांच्या कुटुंबाशी आणि कार्यकर्त्यांशी चौकशी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.


हेही वाचा – मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची वर्णी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -