Monday, May 3, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Pandharpur Assembly By Election : 'पुन्हा नव्या उमेदीने लढू' म्हणत भगिरथ भालकेंनी...

Pandharpur Assembly By Election : ‘पुन्हा नव्या उमेदीने लढू’ म्हणत भगिरथ भालकेंनी मानले मतदारांचे आभार

नाना तुमच्या प्रामाणिकसेवेला पैशाने हरविले

Related Story

- Advertisement -

पंढरपूर पोटनिवडणूकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव झाला आहे. या पराभवामुळे महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. भगीरथ भालकेंनी भरघोस मत दिल्याबद्दल मतदार संघातील मतदारांचे आभार मानले आहेत. तसेच पुन्हा एकदा नव्या उमेदीने लढू असेही भगिरथ भालके यांनी म्हटले आहे. पंढरपूर पोटनिवडणूकीत भगीरथ भालकेंना १ लाख ४ हजार २७१ मते मिळाली आहेत. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने संपुर्ण पाठिंबा दिला होता परंतु भगीरथ भालके यांना परभवाचा सामना करावा लागला आहे. भाजप उमेदवार समाधान आवताडे यांनी सुरुवातीपासूनच आघाडी कायम ठेवली असल्यामुळे त्यांचा विजय झाला आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या निवडणूकीत भगीरथ भालके म्हणजेच भारत भालके यांचे पुत्र यांना उमेदवारी देण्यात आली होती. भगीरथ भालेक यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा होता. तीन पक्ष विरुद्ध भाजप अशी परिस्थिती या निवडणुकीत होती. परंतु भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांचा ३ हाजर ७३३ मतांनी विजय झाला आहे. समाधान आवताडे यांना १ लाख ७ हजार ७७४ मते मिळाली आहेत तर भगीरथ भालके यांना १ लाख ४ हजार २७१ मते मिळाली आहेत.

नाना तुमच्या प्रामाणिकसेवेला पैशाने हरविले – अमोल मिटकरी

पंढरपूर निवडणूकीत भाजप उमेदवार समाधान आवताडे यांनी विजय प्राप्त केला आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारतनाना माफ करा. तुम्ही केलेली सेवा भक्त पुंडलिकरुपी असली तरी तुमच्या सेवेपेक्षा मसल आणि मनीपॉवर वापरून भाजपाने लढवलेली ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची होती.पैसा व सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली. नाना तुमच्या प्रामाणिकसेवेला पैशाने हरविले. अशा आशयाचे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे. यावर पुन्हा नव्या उमेदीने लढू अशी प्रतिक्रिया भगीरथ भालके यांनी दिली आहे.

- Advertisement -

- Advertisement -