घरमहाराष्ट्रझुकणं माझ्या रक्तात नाही...; पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद

झुकणं माझ्या रक्तात नाही…; पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद

Subscribe

नाशिक : काही तरी मिळेल म्हणून झुकणं माझ्या रक्तात नाही. तो दोष मुंडे साहेबांचा आहे. कारण ही शिकवण त्यांनीच मला दिली आहे. तेच आमच्या रक्तात आहे,” असं भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्यात. नाशिकमधील व्ही प्रोफेशनल्स या वंजारी संस्थेतर्फे आरोग्य विज्ञान विद्यापीठात करिअरबाबत मार्गदर्शनासाठी विशेष चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विद्यार्थ्यांसोबत पंकजा मुंडे बोलत होत्या. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका मांडताना गेल्या काही वर्षांपासून राजकारणात सतत डावललं जात असल्याच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. तसेच या कार्यक्रमात त्यांनी राजकारणातील डावपेचांबद्दल रोखठोक विधानं केली.

पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खदखद

- Advertisement -

नाशिकमधील मुलाखतीत पंकजा मुंडे म्हणाल्या की, “ज्या गोष्टी मी मनात बाळगून राजकारणात आले होते, त्या समाजासाठी काम करण्याची, समर्पण करण्याची जर मला मुभा नसेल तर कॉम्प्रोमाइजचं राजकारण करणं मला शक्य होणार नाही, काही तरी मिळेल म्हणून यासाठी झुकणं माझ्या रक्तात नाही. तो दोष मुंडे साहेबांचा आहे. कारण, ही शिकवण त्यांनीच मला दिली आहे. तेच आमच्या रक्तात आहे,” असंही त्यांनी सांगितलं. पुढे त्या म्हणाल्या की, “मोठ्यांचा आदर करण्यासाठी त्यांच्यापुढे झुका; पण काहीतरी मागण्यासाठी कधीही झुकू नका. तुम्हाला हवे ते तुमच्या हिमतीवर मिळवा,” असा सल्ला पंकजा मुंडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.

 

- Advertisement -

हेही वाचा   :

पंकजा मुंडेंबाबत प्रीतम मुंडेंचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या, ‘सगळे घाव झेलायला ताई आणि…’

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -