घरमुंबईभाजपनेच शिवसेना फोडली; गिरीश महाजन यांची कबुली

भाजपनेच शिवसेना फोडली; गिरीश महाजन यांची कबुली

Subscribe

महाराष्ट्रातील सत्तांतराचा विचार केला तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले यावर आम्हाला विश्वास बसत नव्हता. हळूहळू गोष्टी घडत गेल्या. तसे हे सत्तांतर सोपे नव्हते. शिवसेनेसारखा पक्ष फोडणे कठीण होते. ऑपरेशन सुरु झाले. एकनाथ शिंदे बाहेर पडले. त्यांच्या पाठोपाठ त्यांचे सैन्य बाेर पडले.

जळगावः शिवसेना फोडणे हे भाजपेचच मिशन होते, अशी कबुली भाजपचे आमदार व मंत्री गिरीश महाजन यांनी एका कार्यक्रमात दिली आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात शिवसेनेत बंड करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री गुलाबराव पाटीलही उपस्थित होते.

महाजन म्हणाले, महाराष्ट्रातील सत्तांतराचा विचार केला तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले यावर आम्हाला विश्वास बसत नव्हता. हळूहळू गोष्टी घडत गेल्या. तसे हे सत्तांतर सोपे नव्हते. शिवसेनेसारखा पक्ष फोडणे कठीण होते. ऑपरेशन सुरु झाले. एकनाथ शिंदे बाहेर पडले. त्यांच्या पाठोपाठ त्यांचे सैन्य बाहेर पडले. आधी सतरा ते आठराजण होते. नंतर तो आकडा ५० वर गेला. शिवसेनेतून ४० जण बाहेर पडले. उद्वव ठाकरे यांना कंटाळून ते बाहेर पडले. मध्येच हे मिशन फेल जाण्याचीही भीती होती. मिशन फेल झाले तर काय करायच, असाही प्रश्न पडला. मात्र पुढे जाऊन गोष्टी घडून आल्या आणि अखेर सत्तांतर झाले. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले.

- Advertisement -

एकनाथ शिंदे यांना अनेकांचे आशिर्वाद होते. अनेकांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली होती. त्यामुळेच शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमन झाले. तुम्ही किमान चार ते पाच तास झोपा, असे मी मुख्यमंत्री शिंदे यांना वारंवार सांगतो. मात्र ते एकत नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अहोरात्र काम करत आहेत. तेच खऱ्या अर्थाने जाणता राजा आहेत. शिंदे-फडणवीस सरकारच सर्वसामान्यांचे सरकार आहे. महाराष्ट्राला न्याय देण्याचे काम हे सरकार करत आहे, असेही मंत्री महाजन यांनी सांगितले.

जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील लोहारी येथे अखिल भारतीय बडगुजर समाजाचे महाधिवेशन पार पडले.  या कार्यक्रमात बोलताना महाजन यांनी भाजपनेच शिवसेना फोडल्याचे गुपित उघड केले. यावेळी महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे हे मंत्रालयाची पायरी सुद्धा चढले नाहीत. घरुन काम करतो. कॉम्प्युटरवर काम करतो, असे काम उद्धव ठाकरे यांनी केले.

- Advertisement -

 

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -