घरमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांनी बीड जिल्ह्यावर निधींचा पाऊस पाडला - पंकजा मुंडे

मुख्यमंत्र्यांनी बीड जिल्ह्यावर निधींचा पाऊस पाडला – पंकजा मुंडे

Subscribe

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात बीड जिल्हा मोठी प्रगत करत आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

‘बीड जिल्ह्यात दुष्काळ असून पाऊस पडला नाही. मात्र, मुख्यमंत्र्यांनी बीड जिल्ह्यावर निधींचा पाऊस पाडला’, असं महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. बुधवारी बीडमध्ये नगरपरिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या ४०० कोटी रुपयांच्या विविध योजनांचा शुभारंभ आणि विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा रुग्णालयात महिला आणि शिशू विभागासाठी नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजनही करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्यासाठी ४९५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. हा निधी दोन टप्प्यांमध्ये दिला जाणार आहे. या कार्यक्रमावेळी भाषण करताना पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वर टीकास्त्र सोडले.

‘राष्ट्रवादीने बीडमध्ये फक्त राजकारणच केले’

पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली. पंकजा म्हणाल्या की, ‘राष्ट्रवादी काँग्रेसने बीडमध्ये गेल्या १० वर्षांत फक्त राजकारणच केले. राष्ट्रवादीने पक्षातच दोन तुकडे पाडले. एक त्या राष्ट्रवादीत आणि या राष्ट्रवादीत. बीड जिल्ह्यानं डझनभर आमदार दिले. पण, या आमदारांनी बीड जिल्ह्याला रुपयाचा निधी दिला नाही. साधी पंचायत समितीची इमारत उभी करण्यासाठी निधी मिळाला नाही. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४९५ कोटी रुपयांचा निधी दिला’. यापुढे पंकजा मुंडे म्हणाल्या की, पुर्वीच्या काळी फक्त कागदावरच रस्ते बनायचे. त्यामुळे स्वत:चे बगलबच्चे पोसण्याचे काम यापूर्वी झाले आहे. आता तर सगळं ऑनलाईन आहे. टेंडर ऑनलाईन निघतात. त्यामुळे कुणालाही पोसण्याचे काम आमच्याकडून होत नाही. लोकांच्या दारापर्यंत विकासाची गंगा पोहचवण्याच काम आम्ही करतो. गेल्या ७० वर्षांपासून बीड जिल्ह्याच्या रेल्वेचं स्वप्न होतं. रेल्वेचा हा प्रश्न मार्गी लावण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केलं. या रेल्वेसाठी २८०० कोटी मंजूर झाले आहेत.

- Advertisement -

‘मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात बीडची प्रगती’

पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात बीड जिल्हा मोठी प्रगत करत आहे. बीड जिल्ह्यात महामार्गाचे काम सुरु आहे. ६ हजार कोटींचे महामार्ग बीड जिल्ह्यात होत आहेत. तब्बल ९५० किमी लांबीचे हायवे बीड जिल्ह्यात होत आहेत.’


हेही वाचा – ‘शेतकऱ्यांनी कमी दरात तूर विकू नये’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -