घरमहाराष्ट्रपरमबीर सिंह-वाझेमध्ये तासभर चर्चा; मुंबई पोलीस करणार भेटीची चौकशी

परमबीर सिंह-वाझेमध्ये तासभर चर्चा; मुंबई पोलीस करणार भेटीची चौकशी

Subscribe

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह सोमवारी चांदीवाल आयोगासमोर हजर झाले. यावेळी परमबीर सिंह आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यात तासभर चर्चा झाली. या चर्चेची आता मुंबई पोलीस तपास करणार आहेत. दोघे कोणाच्या परवानगीने भेटले याचा पोलीस तपास करणार आहेत.

मुंबई पोलीस सचिन वाझेला कारागृहातून आयोगासमोर आणणाऱ्या पथकाचीही चौकशी करु शकतं. आज परमबीर सिंह यांना चांदीवाल आयोगाने समन्स बजावले होते आणि याच दरम्यान सचिन वाझेलाही बोलावण्यात आलं होतं. या दरम्यान वाझे आणि परमबीर सिंह यांना भेटण्याची परवानगी आयोगाकडून मिळाल्याचा दावा सचिन वाझेच्या वकिलाने केला आहे. मुंबई पोलीस हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे की, परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांना भेटीसाठी अधिकृत परवानगी होती की, नाही? याचा तपास मुंबई पोलीस करणार आहेत. जर अशी अधिकृत परवानगी नसेल तर या दोघांची भेट कशी झाली? याचा तपास मुंबई पोलीस करणार आहेत.

- Advertisement -

परमबीर सिंहांविरोधातील वॉरंट रद्द

परमबीर सिंह सोमवारी चांदिवाल चौकशी आयोगासमोर हजर झाले. आयोगाने त्यांच्याविरोधातील जामीनपात्र अटक वॉरंट रद्द करून त्यांना दिलासा दिला. मात्र, गैरहजर राहिल्याबद्दल त्यांना १५ हजार रुपयांचा दंड सुनावला. ही रक्कम आठवडाभरात मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याची हमी परमबीर यांच्याकडून आयोगासमोर देण्यात आली.


हेही वाचा – चांदीवाल आयोगाचं अनिल देशमुखांना प्रॉडक्शन वॉरंट; ३० नोव्हेंबरपर्यंत हजर राहण्याचे आदेश

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -