घरमनोरंजनशनायाची आकाशात नवी झेप, व्हिडिओ पाहून चाहते थक्क

शनायाची आकाशात नवी झेप, व्हिडिओ पाहून चाहते थक्क

Subscribe

रसिका सुनिल हिने माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून निरोप घेतल्यानंतर अशा प्रकारे ती तिच्या सुट्ट्या इंन्जॉय करताना दिसली.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनिल हीने तिच्या अभिनयाने अनेक प्रेक्षकांची मनात जिंकली आहेत. तिचे ग्लॅरस फोटो चाहत्यांना भुरळ पाडून जातात. रसिका सोशल मीडियावरही बरीच अॅक्टीव्ह असते. तिचे व्डिडिओ आणि बोल्ड फोटो ती नेहमीच चाहत्यांबरोबर शेअर करते. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत रसिकाने नकारात्मक भूमिका साकारल्याने सुरुवातीला प्रेक्षकांनी तिच्यावर टिका केली. मात्र कालांतराने तीने तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. मालिका संपल्यानंतर रसिका सध्या तिची सुट्टी इन्जॉय करतेय. रसिकाने नुकताच तिच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती हेलिकॉप्टर चालवताना दिसत आहे. रसिका सध्या हेलिकॉप्टर चालवण्याचं प्रशिक्षण घेत असल्याचे तिने सांगितले आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने ” जेव्हा मी विमान उड्डाणंचे धडे घेत होते. ” असे कॅप्शन रसिकाने दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

 रसिकाच्या या व्हिडिओला चाहत्यांची मोठी पसंती मिळत आहे. चाहत्यांसोबतच अनेक कलाकारांच्या कमेंटचा वर्षाव तिच्या व्हिडिओवर होताना दिसत आहे. रसिका ही दोन वर्षांपूर्वी माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका सोडून लॉस एंजिलसला पुढील शिक्षणासाठी गेली होती. त्यावेळचे अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. यादरम्यान तीची आणि आदित्य बिलागीची भेट झाली. त्यानंतर ती आदित्यला डेट करत असल्याच्या चर्चा ही रंगल्या होत्या.

- Advertisement -

हे वाचा- सर्जनशील लेखक, दिग्दर्शक सागर सरहदी यांचे निधन!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -