घरमहाराष्ट्रराज्यातील 1185 शाळांकडे पालकांनी फिरवली पाठ

राज्यातील 1185 शाळांकडे पालकांनी फिरवली पाठ

Subscribe

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शाळांमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत राज्यातील तब्बल 1185 शाळांतील प्रवेशांकडे पालकांनी पाठ फिरवली आहे. या शाळांमधील प्रवेशासाठी एकही प्रवेश अर्ज आलेला नाही. यामध्ये सोलापूर, कोल्हापूर ठाणे, पालघर, सांगली व सातारा या जिल्ह्यातील शाळांचा सर्वाधिक समावेश आहे.

ज्युनिअर केजी आणि प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी खासगी शाळांमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. राज्यात 9195 शाळांमध्ये 1 लाख 16 हजार 779 जागा उपलब्ध होत्या. या जागांसाठी 2 लाख 44 हजार 933 पालकांनी अर्ज केले होते. 8 एप्रिलला झालेल्या प्रवेशाच्या पहिल्या सोडतीत 67 हजार 706 जागांची यादी जाहीर झाली. आरटीई प्रवेशासाठी राज्यातील मराठी, हिंदी, इंग्रजी या माध्यमाच्या 1185 शाळांमध्ये 14 हजार 263 जागा उपलब्ध होत्या. या जागांसाठी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. या सर्व शाळांमध्ये पहिलीपासून प्रवेश देण्यात येत आहे. एकही प्रवेश अर्ज न भरलेल्या शाळांमध्ये सोलापूर पहिल्या क्रमांकावर आहे.

- Advertisement -

सोलापूरमध्ये 149 शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरलेला नाही. त्याखालोखाल कोल्हापूर (144), ठाणे (129), पालघर (121), सांगली (118), सातारा (103) या जिल्ह्यांतील शाळांचा समावेश आहे. तर सर्वाधिक कमी अर्ज दाखल झालेल्या शाळांमध्ये भंडारा जिल्हा आघाडीवर आहे. भंडारा जिल्ह्यात चार शाळांमध्ये अर्ज भरण्यात आले नाही. तर हिंगोली (8), गोंदिया (9), धुळे व वर्धा या जिल्ह्यांमधील प्रत्येकी 10 शाळांकडे पालकांनी पाठ फिरवली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -