घरताज्या घडामोडीPDCC Bank Election : राष्ट्रवादीला प्रतिष्ठित जागी दणका, अजित पवारांनी ज्यांच्याविरोधात दंड...

PDCC Bank Election : राष्ट्रवादीला प्रतिष्ठित जागी दणका, अजित पवारांनी ज्यांच्याविरोधात दंड थोटपले ते प्रदीप कंद विजयी

Subscribe

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दणका बसला आहे. राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची असलेल्या जागेवर भाजपच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्यांच्याविरोधात दंड थोपटले होते. ते भाजपचे उमेदवार प्रदीप कंद विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश घुले यांचा पराभव केला आहे. राष्ट्रवादीतून कंद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. प्रचार करताना अजित पवारांनी कंद यांना जागा दाखवून देण्याचे आवाहन केले होते. परंतु प्रदीप कंद यांचाच विजय झाला असल्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सुरुवातील महाविकास आघाडीने आघाडी घेतली होती. तसेच राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार आणि राष्ट्रवादीचे नेते सुनील चांदेरे यांचा विजय झाले आहेत. तसेच राष्ट्रवादीचे विकास दांगट यांचा विजय झाला आहे. आमदार अशोक पवार यांना 73 मते मिळाली असून त्यांनी भाजपच्या आबासाहेब गव्हाणेंचा पराभव केला आहे. राष्ट्रवादी उमेदवार सुनील 27 मतांनी विजयी झाले असून त्यांनी भाजपचे आत्माराम कलाटे यांना पराभूत केलं आहे.

- Advertisement -

अजित पवारांना मोठा धक्का

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्या जागेवरील निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्या जागेवर राष्ट्रवादीचा पराभव झालाय. राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेलेल्या प्रदीप कंद यांचा विजय झाला आहे. तसेच राष्ट्रवादीच्या सुरेश घुलेंचा १४ मतांनी पराभव झाला आहे. या बँकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकहाती सत्ता होती. २१ पैकी २१ जागा अजित पवारांकडे होत्या तर यंदा जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये २१ पैकी १४ जागा बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित जागांवर प्रत्यक्षात मतदान प्रक्रिया घेण्यात आली आहे.


हेही वाचा : OBC समाजाचा अपमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा घेणार का?, भाजपचा राष्ट्रवादीला सवाल

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -