घरमहाराष्ट्रपंढरपूरला येणाऱ्या पालखीसह १०० वारकऱ्यांना परवानगी द्या, वारकरी सेवा संघाची मागणी

पंढरपूरला येणाऱ्या पालखीसह १०० वारकऱ्यांना परवानगी द्या, वारकरी सेवा संघाची मागणी

Subscribe

मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

यंदा कोरोना व्हायरसचे सावट हे महाराष्ट्रातील वारकऱ्यांवर देखील असल्याचे दिसतेय. महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या सांस्कृतिक आणि धार्मिक सोहळ्यांपैकी आषाढी एकादशीची वारी एक असते. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने दरवर्षी प्रमाणे लाखोच्या संख्येने वारकऱ्यांना या माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होता येणार नाही, असे दिसतेय.

मात्र तरी देखील किमान शंभर वारकऱ्यांसह माऊलींची पालखी पंढरपूरात घेऊन जाण्यास परवानगी द्या, अशी मागणी वारकरी सेवा संघाची आहे. या मागणीची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून त्यावर मंगळवारी तातडीने सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

शेकडो वर्षांपासून सुरू असलेली पंढरपूरच्या वारीची परंपरा अविरत मानाच्या नऊ प्रमुख पालख्यांसह दोन हजारांच्या आसपास दिंड्या शेकडो मैलांचा प्रवास करुन पंढरपुरच्या दिशेने थाटात रवाना होत असतात. मात्र दिवसेंदिवस वाढत असणारी कोरोना रूग्णांची संख्या आणि कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व धार्मिक, कौटुंबिक सोहळे साधेपणाने कमी लोकांच्या उपस्थितीत पार पाडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

६ किमीच्या प्रवासात १०० वारकऱ्यांना परवानगी मिळावी

लाखो वारकरी समुदायाच्या उपस्थितीत दरवर्षी या वारकऱ्यांच्या वारीचे उत्साहात माऊलींच्या पालखीसह पंढरपुरात प्रस्थान होत असते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाचं पंढरपूरची वारी रद्द करण्याचा निर्णय २९ मे रोजी सरकारने जाहीर केला आहे. असे असले तरी देखील वाखरी ते पंढरपूर या अंतिम ६ किलोमीटरच्या प्रवासात १०० वारकऱ्यांच्या उपस्थितीत दिंडी काढण्यास परनावगी देण्यात यावी, अशी मागणी करणारी रिट याचिका वारकरी सेवा संघाने अॅड. मिहिर गोविलकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

- Advertisement -

असा याचिकेत केला दावा

सर्वोच्च न्यायालयाने जगन्नाथ पुरी रथ यात्रेला दिलेल्या अटी शर्तीप्रमाणे स्वच्छता, आरोग्य, आणि सामाजिक अंतर पाळणे, अशा नियमांचे आम्ही पालन करणार आहोत. असा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे. या याचिकेवर मंगळवारी तातडीने न्यायमूर्ती उज्जल भुयान आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.

२० वारकऱ्यांसह पालखी बसने मार्गस्थ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पायी वारी सोहळा रद्द करण्यात आला असून यंदा बसने पंढरीच्या पालखीची वारी होणार आहे. या वारीसाठी सरकारने काही नियम देखील केले आहे.

असे आहेत नियम

  • बसने जाणाऱ्या संतांच्या पालख्या रस्त्यात कोठेही न थांबता पंढरपूरसाठी मंगळवारी प्रस्थान होतील
  • संत श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत सोपानदेव महाराज आणि संत चांगावटेश्वर यांच्या पालख्या पंढरपूरला थेट प्रस्थान होतील
  • या सर्व पालख्या वेगवेगळ्या बसच्या माध्यमातून पंढरपूरला रवाना होतील
  • सर्व पालख्या मंगळवारी ३० जून रोजी रात्री ११ वाजेपर्यंत पंढरपुरात आगमन होणे आवश्यक असणार आहे.
  • प्रत्येक पालखीसोबत बसमधून केवळ २० वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे.

पंढरपूरमध्ये २ जुलैपर्यंत संचारबंदी लागू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -