घरमहाराष्ट्रमिशेल मामाशी नातं काय? मोदींचा काँग्रेसला सवाल

मिशेल मामाशी नातं काय? मोदींचा काँग्रेसला सवाल

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी मोदी काय बोलणार याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.

चौकीदार ना सोता है, ना सोने देता है – पंतप्रधान नरेंद्र मोदी


आता दलालांना मलाई खाता येत नाही. नरेंद्र मोदींनी काँग्रेसला केली टीका

- Advertisement -

मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार राफेल करारामध्ये देखील मिशेलनं लॉबिंग केली. काँग्रेस मिशेल कनेक्शनवर उत्तर देणार का? मिशेल मामाशी नातं काय? काँग्रेस उत्तर देणार? चौकीदारानं झोपावं की जागावं? ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणावरून काँग्रेसला लक्ष्य.


अटल पेन्शन योजनेचे सव्वा लाख गरिबांना फायदा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

- Advertisement -

काँग्रेसनं १० वर्षात ८ लाख घरं बांधली. पण, भाजप सरकारनं ४ वर्षात ७० लाख घरं बांधल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.


यापूर्वीचं सरकार रिमोटवर चालणारं सरकार होतं. २००४ ते २०१४ मध्ये केवळ १३ लाख घरं कगदावर बांधली गेली. तर प्रत्यक्षात आम्ही एका वर्षात ८० हजार घरं बांधल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.


लवकरच सर्वांना हक्काच्या घराची चावी मिळेल असा आश्वासन यावेळी पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना दिले.


आगामी काळात वेगानं विकसित होणारी १० शहरं भारतातील असतील असा विश्वास यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.


दरम्यान सोलापूरमध्ये विमानतळ व्हावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं देखील यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.


संकुतिच विचाारांमुळे देशाचा विकास खुंटला अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे.


दरम्यान, ३० हजार घरांची चावी देण्यासाठी आम्हीच येणार असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘फिर मोदी’चा नारा दिला आहे.


आम्ही केवळ दिखाव्यासाठी काम करत नाही असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. दरम्यान, आमच्या काळात झालेल्या विकासकामांचं उद्घाटन आम्हीच करणार म्हणत अप्रत्यक्ष का असेना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.


रस्त्यांच्या बांधकामाचं काम सध्या जोरात सुरू असून आज घडीला आम्ही ५२ हजार किमी राष्ट्रीय महामार्ग बांधण आहोत.


सबका साथ, सबका विकास हाच आमचा अजेंडा आणि परंपरा आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे.

——————————————————————————————————

मतांसाठी आरक्षणाचं राजकारण करणाऱ्यांना सवर्ण मागासांना आर्थिक आरक्षण दिल्यानं मोठी चपराक बसली असं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

——————————————————————————————————

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सवर्णांना दिलेलं १० टक्के आर्थिक आरक्षण राज्यसभेत देखील पारित होईल अशी आशा व्यक्त केली.

——————————————————————————————————

यावेळी १ हजार कोटींच्या सोलापूर उस्मानाबाद रेल्वे मार्गाला मंजूरी देत असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

——————————————————————————————————

भाषणादरम्यान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील फडणवीस सरकारचं देखील कौतुक केलं.

——————————————————————————————————

रस्ते, पाणी, वीज या समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यापूर्ण करण्यासाठी वेगानं प्रयत्न सुरू असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे.

——————————————————————————————————

सोलापूरच्या जनतेनं भरभरून प्रेम दिलं. अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थितांनी मोदी – मोदी अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा जयघोष केला.

——————————————————————————————————

सोलापूरच्या भाषणाची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीतून केली. सर्वांचे जाहीर आभार, सर्वांना अभिवादन.

——————————————————————————————————

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूर – तुळजापूर – उस्मानाबाद हायवेचं उद्घाटन केलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांनी रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन केलं त्यांच्याच हस्ते रस्त्याचं उद्घाटन झालं असं म्हणत नरेंद्र मोदींवर कौतुकांचा वर्षाव केला. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या भाषणाकडे मात्र सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -