घरमहाराष्ट्रएटीएममधून पैसे काढून फसवणूक करणारा भामटा गजाआड ; दोघे फरार 

एटीएममधून पैसे काढून फसवणूक करणारा भामटा गजाआड ; दोघे फरार 

Subscribe

नागरिकांच्या मदतीने या एका भामट्याला पकडण्यात यश आले आहे. तर दोघे साथीदार फरार झाले आहेत. काल (१३ मार्च) संध्याकाळी माणकोली नाका येथे ही घटना घडली होती.

भिवंडी – रुमालाच्या गड्डीतील पैशांचे अमिष दाखवून एटीएममधून पैसे काढून पळून जाण्याच्या तयारीतील तिघांपैकी एकाला पोलिसांच्या हावाली करण्यात आले आहे. नागरिकांच्या मदतीने या एका भामट्याला पकडण्यात यश आले आहे. तर दोघे साथीदार फरार झाले आहेत. काल (१३ मार्च) संध्याकाळी माणकोली नाका येथे ही घटना घडली होती. सुनिल रामचंद्र वाघमारे (२० रा. म्हारळ गांव ) असे पकडण्यात आलेल्या भामट्याने नांव आहे.

अशी घडली घटना

सुनिल रामचंद्र वाघमारेने अन्य दोन साथीदारांच्या मदतीने माणकोली नाका येथील युनियन बँकेच्या समोरील एटीएममधून पैसे काढण्यासाठी आलेल्या राहुल वसंत चव्हाण (२२ रा.माणकोली ) याला रुमालात पैशांची गठडी असल्याचे दाखवले. यामध्ये सव्वा लाख रुपये आहेत, असे सांगितले.

- Advertisement -

पैशांची गठडी त्याच्याकडे देऊन आता माझ्या दोन साथीदारांना ठाणे रेल्वे स्टेशनवर सोडायचे आहे. मी ठाण्याहून आल्यावर पैसे वाटून घेऊ सद्या तुझ्याकडील एटीएम कार्ड मला दे असे सांगून बोलण्यात गुंतवून १३ हजार रुपये एटीएममधून काढून घेतले.

पैसे काढून पळण्याच्या तयारीत असताना यातील राहूलला नागरिकांच्या मदतीने पकडून नारपोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक गौरव व्हरकटे यांनी अटक केले. अटक केलेल्या भामटा राहुल याला गुरुवारी न्यायालयात हजर केले. त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -