घरमहाराष्ट्रदरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक

दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला अटक

Subscribe

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका दरोडे खोरांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. निवणुकीच्या पार्श्वभूमीवर मात्र गस्तीवर असलेल्या इतर पोलिसांनी या दरोडे खोरांना अटक केली आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या शहरात पोलिसांनी अनेक ठिकाणी नाकाबंदी करत गस्त वाढवण्यात आली आहे. याच दरम्यान, दरोड्याचा तयारीत असलेल्या पाच जणांना दिघी पोलीस आणि निवडणूक विभागाच्या स्टॅटिक सर्वेलन्स पथकाने ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून २ गाठी पिस्तुलसह ५ जिवंत काडतुसे, मिर्ची पूड, दोरी, लाकडी दांडके मिळाली आहेत. केशव सूर्यवंशी,मनोज थिटे,रणजित लोखंडे,आकाश चव्हाण आणि भागवत कुंभारे अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याचा अधिक तपास दिघी पोलीस करत आहेत.

कसा घडला प्रकार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात गस्त वाढवण्यात आली आहे. तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी स्टॅटिक सर्वेलन्स पथकाने देखील गस्तीवर असते. बुधवारी रात्रीच्या सुमारास दिघी मॅगझीन चौक येथे संशयित चारचाकी जात असताना तिला थांबविण्यात आले. त्यामध्ये पाच इसम असल्याचे समजून आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने झडती घेतली. आरोपी लक्ष्मण याच्याकडे सुरी मिळून आली. तर मनोजकडे एक गावठी पिस्तुल आणि तीन जिवंत काडतुसे मिळाली, तर रणजितकडे एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे आणि आकाशकडे नायलानची दोरी आणि मिर्ची पूड मिळून आली. गाडीच्या डीक्कीमध्ये दोन लाकडी दांडके मिळाली आहेत. हे सर्व जण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -