घरमहाराष्ट्रपुणेकसबा पेठ पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान पोलिसांना सापडले लाखो रुपये

कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान पोलिसांना सापडले लाखो रुपये

Subscribe

राज्यात सध्या कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. भाजप आणि महाविकास आघाडीकडून आपापल्या उमेदवारांसाठी जोरदार प्रचार करण्यात येत आहे. अशातच पुण्यामध्ये पोलिसांकडून निवडणुकीच्या प्रचारातील गैरप्रकार रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

कसबा पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकारी आणि पोलीस चेक पोस्टवर गाड्यांचा तपास करत आहेत. पोलिसांकडून आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडून सर्व गाड्यांची नीट तपासणी करण्यात येत आहे. याचदरम्यान निवडणूक अधिकारी आणि पोलिसांना एका गाडीमध्ये पाच लाखाची रोकड आढळून आली आहे. याप्रकरणी तात्काळ कारवाई करत स्वारगेट पोलीस आणि निवडणूक अधिकारी यांच्याकडून ही रोकड जप्त करण्यात आली आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांच्याकडून माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी ही कारवाई करत गाडी जप्त करून चालकाला ताब्यात घेतले आहे. हे पैसे कशासाठी वापरले जाणार होते? याची माहिती अजून मिळाली नाही. मात्र आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आता अधिक सतर्क झाले आहेत. तसेच याचा पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.

कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये येत्या २६ फेब्रुवारी रोजी पोट निवडणुकीसाठी मतदान घेण्यात येणार आहे. या दोन्ही ठिकाणी विजयासाठी भाजप आणि मविआकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री द्रवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता. १५ फेब्रुवारी) सात तास बैठकी घेतली. यामुळे भाजप विजयासाठी प्रयत्नशील असल्याचे आता बोलले जात आहे. मात्र, या सर्व घडामोडींमध्ये कसबा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पोलिसांना पाच लाखांची रोकड सापडल्याने खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राहुल कलाटेंना वंचितचा पाठिंबा, मविआला सुरुवातीलाच धक्का?

दरम्यान, पोलिसांना यावेळी आढळून आलेल्या रकमेनंतर निवडणूक अधिकारी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये याबाबत अधिक चौकशी करत असल्याची माहिती समोर आली आहे. ज्या गाडीत ही रक्कम आढळून आली आहे, त्या गाडी चालकाची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. मात्र, चालकाकडून योग्य उत्तर मिळत नसल्याने निवडणुकीसाठीच ही रोकड आणली असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. जर ही रक्कम मतदारांमध्ये वाटण्यासाठी आणली असल्यास यातील काही रक्कम मतदारांमध्ये वाटण्यात आली आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, ऐन मतदानापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -