घरक्राइमCrime News : प्रेमप्रकरणातून वाद अन् आईने मुलीची गळा आवळून केली हत्या

Crime News : प्रेमप्रकरणातून वाद अन् आईने मुलीची गळा आवळून केली हत्या

Subscribe

मुंबई : प्रेमप्रकरणातून झालेल्या वादातून एका महिलेने स्वत:च्या 19 वर्षांच्या मुलीची गळा आवळून हत्या केल्याची घटना वांद्रे परिसरात उघडकीस आली आहे. भूमिका उमेश बागडी असे मृत मुलीचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी तिची आई टिना उमेश बागडी हिला निर्मलनगर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर तिला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. (Crime News Argument over love affair and mother strangles daughter to death)

हेही वाचा – Raj Thackeray : वसंत मोरेंच्या राजीनाम्यानंतर राज ठाकरेंचे पुण्यातील नेत्यांना आदेश

- Advertisement -

सदर घटना सोमवारी मध्यरात्री तीन वाजता वांद्रे येथील नथू गणपत चाळ, प्लॉट क्रमांक 80, सितला माता परिसरात घडली. याच परिसरात आरोपी टीना ही तिची मुलगी भूमिका हिच्यासोबत राहत होती. मृत भूमिका ही वांद्रे येथील चेतना महाविद्यालयात शिकत होती. तिचे एका तरुणासोबत प्रेमप्रकरण होते. या प्रेमकरणाची माहिती समजताच भूमिका आणि आरोपी टिना यांच्यात सतत खटके उडत होते. भूमिकाच्या प्रेमसंबंधाला टीनाचा विरोध असल्याने तिने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. अखेर सोमवारी पहाटे तीन वाजता दोघींमध्ये क्षुल्लक कारणावरुन भांडण झाले. यावेळी रागाच्या भरात भूमिकाने टिनाच्या हाताचा चावा घेतल्याने तिला दुखापत झाली. मात्र रागाच्या भरात टीनाने भूमिकाची गळा आवळून हत्या केली.

हेही वाचा – Eknath Khadse : पन्नासहून अधिक आमदार अन् स्वत: उपमुख्यमंत्री असतानाही अजितदादांना…; खडसेंचा टोला

- Advertisement -

बेशुद्ध झालेल्या अवस्थेत भूमिकाला तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करणयात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच निर्मलनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला टिनाने पोलिसांना सांगितले की, भूमिकाला आकडी आल्याने ती बेशुद्ध झाली. मात्र शवविच्छेदन अहवालात भूमिकाची गळा आवळून हत्या झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे टिनाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान टीनाने घडलेला प्रकार सांगून भूमिकाची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी टीनाविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवून तिला अटक केली. अटकेनंतर टीनाला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -