pooja chavan suicide- मी फक्त तिला रिक्षात ठेवलं, लॅपटॉप, मोबाईलबद्दल माहित नाही – भाजप नगरसेवक

पूजाचा लॅपटॉप व मोबाईल एका भाजप नेत्याने लंपास केल्याची चर्चा सुरू आहे. 'पण मी फक्त तिला रिक्षात ठेवलं तिच्या मोबाईल व लॅपटॉपशी माझा संबंध नसल्याच या भाजप नेत्याने सांगितलं आहे.

टिकटॉकस्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात रोज नवीन नवीन खुलासे होत आहेत. आता पूजाचा लॅपटॉप व मोबाईल एका भाजप नेत्याने लंपास केल्याची चर्चा सुरू आहे. ‘पण मी फक्त तिला रिक्षात ठेवलं तिच्या मोबाईल व लॅपटॉपशी माझा संबंध नसल्याच या भाजप नेत्याने सांगितलं आहे. धनराज घोगरे असे त्यांचे नाव असून पुण्यात आज त्यांनी पत्रकार परिषदेत आपल्यावर लावलेले स्र्व आरोप फेटाळून लावले.

पूजा आत्महत्या प्रकरणाशी वनमंत्री संजय राठोड यांचा संबंध असल्याचे समोर आल्यापासून रोज नवीन माहिती समोर येत आहे. याप्रकरणामुळे अडचणीत आल्याने राठोड यांना राजीनामाही द्यावा लागला आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून एका भाजप नेत्याने पूजाचा मोबाईल व लॅपटॉप चोरल्याच्या बातम्या येत आहेत. तसेच तो नेता गायब असल्याचेही बोलले जात होते. पण हा नेता कोण हे मात्र कळाले नव्हते. पण आज पुण्यात भाजपचे नगरसेवक धनराज घोगरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी आपली बाजू मांडली. ‘पूजा जेव्हा इमारतीवरून खाली पडली तेव्हा मी माणुसकीच्या नात्यातून फक्त तिला उचलून रिक्षात ठेवले. तेव्हा तिथे अरुण राठोड व विलास चव्हाण हे दोघेही हजर होते. पूजाला तातडीने उपचार मिळावे हाच माझा हेतू असल्याचंही धनराज यांनी सांगितलं. तसेच पूजाच्या फ्लॅटमध्ये मी गेलो नाही व तिच्या कोणत्याही वस्तूला हात लावला नाही असेही ते यावेळी म्हणाले.