घरताज्या घडामोडीनितेश राणेंच्या अटकेसाठी नारायण राणेंवर दबाव आणण्याचा प्रयत्न - प्रवीण दरेकर

नितेश राणेंच्या अटकेसाठी नारायण राणेंवर दबाव आणण्याचा प्रयत्न – प्रवीण दरेकर

Subscribe

केंद्रीय मंत्री नारायणे राणे यांच्या घरावर नोटीस चिटकवून त्याचं व्हिडिओग्राफी करणार आहेत. यावर नारायण राणे कॅबिनेटमध्ये मंत्री आहेत, याचं भान ठेवण्याची आवश्यकता आहे. सर्व कायद्यासमोर समान आणि एक आहे. यासंबंधित आम्ही सहमत आहोत. परंतु केंद्रीय मंत्री म्हणून काही प्रीव्हीलेज आहेत. त्यांच्या संदर्भात पोलिसांची कारवाई करत असताना काही प्रक्रिया पार पाडावी लागते. नितेश राणेंना अटक करायची आहे आणि नारायण राणेंवर दबाव आणण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जात आहे. त्यामुळे नियोजनबद्ध राणेंना अडकावण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे, असं भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले.

नितेश राणेंच्या अटकेसाठी नारायण राणेंवर दबाव आणण्याचा प्रयत्न

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी दरेकर म्हणाले की, मला वाटतं या ठिकाणी साधनसुचिता पाळण्याची गरज आहे. त्या ठिकाणी पोलीस कुणाचेही खासगी नोकर नाहीयेत. त्यांनी नारायण राणे कॅबिनेटमध्ये मंत्री आहेत, याचं भान ठेवण्याची आवश्यकता आहे. सर्व कायद्यासमोर समान आणि एक आहे. यासंबंधित आम्ही सहमत आहोत. परंतु केंद्रीय मंत्री म्हणून काही प्रीव्हीलेज आहेत. त्यांच्या संदर्भात पोलिसांची कारवाई करत असताना काही प्रक्रिया पार पाडावी लागते. परंतु सर्व कायदे, नियम, निती गुंडाळून आम्हाला राणेंवर कारवाई करायची आहे. नितेश राणेंना अटक करायची आहे आणि नारायण राणेंवर दबाव आणण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जात आहे. त्यामुळे नियोजनबद्ध राणेंना अडकावण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे.

- Advertisement -

नितेश राणे कुठे आहेत ?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नितेश कुठे आहे हे मला माहितेय, पण मी त्यांचा पत्ता कशाला सांगू?, अशा प्रकारचं सूचक वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. परंतु यावर पत्रकारांनी दरेकरांना प्रश्न विचारला असता. ते म्हणाले की, वडील म्हणून मुलाचे नाते संबंध असतात. मुलाचा ठावठिकाणा त्यांना माहिती नसेल, असं मी म्हणणार नाही. परंतु त्यांनी ते कसं सांगाव, कुठे सांगावं, याचं उत्तर ते वेळ आल्यावरच देतीय. जेव्हा पोलीस त्यांना प्रत्यक्षदर्शी प्रश्न विचारतील आणि वकिलाच्या माध्यमातून प्रतिसाद देतील तेव्हा, यावर नारायण राणे निश्चितरूपाने उत्तर देतील आणि त्यांनी द्यावं, असं माझं म्हणणं आहे. परंतु पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं नसेल, तर त्यांचीही काही भूमिका असू शकते. उद्या जर नितेश राणेंचा पत्ता सांगितला. त्यानंतर शिवसेनेच्या जमावाने त्या ठिकाणी जाऊन त्यांच्यावर हल्ला केला. तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल दरेकरांनी उपस्थित केला आहे.

 राणेंनंतर आता नितेश राणेंवर अटकेची कारवाई

नारायण राणे यांच्यानंतर नितेश राणेंवर कारवाई करण्यात येत आहे. परंतु भाजप प्रत्येक गोष्टीला सामोरे जाईल. मात्र,  देशाच्या कॅबिनेट मंत्र्याला अवमानित करून अटक करण्यात आली. कुठल्याही प्रकारचं प्रीव्हीलेज न पाळता. आम्हाला वाटतं की आम्ही त्यांना अटक करू, ही भूमिका मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्या संदर्भात नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली होती. तशाच प्रकारची युक्ती या गुन्ह्यात दिसत आहे, असं प्रविण दरेकर म्हणाले.

- Advertisement -

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांकडून नोटीस

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नितेश कुठे आहे हे सांगायला मी मूर्ख आहे काय ? असा प्रतिसवाल पत्रकारांना केला होता. यावरून नितेश राणे कुठे आहेत हे केंद्रीयमंत्री राणेंना माहिती असण्याची शक्यता गृहीत धरून कणकवली पोलिसांकडून नारायण राणे यांना चौकशीला हजर राहण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे.


हेही वाचा : Income Tax Filing : आयकर विभागाच्या ‘या’ निर्णयामुळे करदात्यांना मिळणार मोठा दिलासा, जाणून घ्या निर्णय


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -