Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी संजीव जयस्वाल यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप, मुख्यमंत्री चौकशी करणार का? दरेकरांचा सवाल

संजीव जयस्वाल यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप, मुख्यमंत्री चौकशी करणार का? दरेकरांचा सवाल

ठाण्याचे संजय घाडीगावकर यांनी केलेल्या सर्व तक्रारींचे काय झाले?

Related Story

- Advertisement -

ठाण्याचे माजी पोलीस आयुक्ता यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहित ठाण्यातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक संजय घाडीगावकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या पत्रानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी संजीव जयस्वाल यांची चौकशी मुख्यमंत्री करणार का? असा सवाल केला आहे. संजीव जयस्वाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि गैरव्यवहाराचे आरोप आहेत. ठाण्याचे महापालिका आयुक्त असतानाही अशीच प्रकरणे असल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. यामुळे भ्रष्टाचाराची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

ठाण्याचे माजी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी एक पानाचे पत्र मुख्यमंत्र्याना लिहून ठाण्यातील गोल्डन गँगच्याबाबत तक्रार केली आहे. ठाण्यात खंडणी आणि आर्थिक गैरव्यवहार गेल्या कित्येक वर्षापासून सुरु असल्याची तक्रार जयस्वाल यांनी केली आहे. तसेच ठाण्याचे आयुक्त असताना धमकी दिल्याचाही उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. ठाण्याचे आयुक्त असताना राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक संजय घाडीगावकर यांच्याविरोधात कारवाई केल्यामुळे नगरसेवक पद धोक्यात आले. याचा बदला घेण्यासाठी आपल्यावर खोटी तक्रार दाखल केली असल्याचे संजीव जयस्वाल यांनी म्हटले आहे.

संजीव जयस्वाल यांच्याविरोधात चौकशी करा

- Advertisement -

कोरोना काळात मुंबईत कोविड सेंटर उभारणी, भोजन पुरवठा अशा अनेक कंत्राटात मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याविरुद्ध अनियमितता, भ्रष्टाचार व गैरव्यवहाराचे आरोप आहेत. ठाण्याचे महापालिका आयुक्त असतनाही अशीच प्रकरणे आहेत. या त्यांच्या दोन्ही कार्यकाळातील भ्रष्टाचार प्रकरणांची सखोल चौकशी करुन कारवाई झाली पाहिजे. ठाण्याचे संजय घाडीगावकर यांनी केलेल्या सर्व तक्रारींचे काय झाले? असा सवाल प्रवीण दरेकर यांनी केला आहे. तसेच संजय घाडीगावकर यांनी तक्रारी केल्या म्हणून त्यांच्यावर दबाव आणण्याचा होत असलेला प्रयत्न दुर्दैवी आहे. संजीव जयस्वाल यांची चौकशी मुख्यमंत्री करणार का? असा सवालही विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

- Advertisement -