घरमहाराष्ट्रबलात्काराच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन

बलात्काराच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन

Subscribe

आरोपीचा पुन्हा बलात्काराचा प्रयत्न

बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीने अटकपूर्व जामिनावर असताना पुन्हा पीडित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातील कोरेगाव भीमा येथे हा प्रकार उघडकीस आला आहे. महिलेने या नराधमाला विरोध केला म्हणून आरोपीने पीडित महिलेला जीवे मारण्याचाही प्रयत्न केला. राहुल वाळके असे आरोपीचे नाव असून घटनेनंतर तो फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पीडित महिला उदरनिर्वाहासाठी गेल्या दहा वर्षांपासून पुण्यातील पेरणे येथे वास्तव्यास होती. पीडित महिलेच्या पतीने काही दिवसांपूर्वी आरोपी राहुळ वाळकेकडून उधार पैसे घेतले होते. याचाच गैरफायदा राहुल पीडित महिलेशी मैत्री करून आणि जादूटोण्याचे ढोंग करत होता. यादरम्यान आरोपी राहुलने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. अखेर पीडित महिलेने याप्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. महिलेच्या तकारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार आणि जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. मात्र, आरोपीला अटकपूर्व जामीन मिळाल्याने तो मोकाट फिरत होता.

- Advertisement -

जामिनावर बाहेर असताना आरोपी राहुलने पीडित महिलेला धमक्या देणे सुरुच ठेवले होते. आरोपीच्या धमक्यांच्या भीतीपोटी पीडित महिला पेरणेहून भीमा कोरेगाव येथे रहायला आली होती. मात्र, तिथेही आरोपीने तिला त्रास देणे सुरूच ठेवले. गुरुवारी आरोपी राहुलने तिच्या घरी जाऊन तिच्यावर पुन्हा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. महिलेने याचा विरोध केला म्हणून तिला जीवे मारण्याचाही राहुलने प्रयत्न केला. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये पीडित महिलेच्या तक्रारीवरून रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. आरोपीला तातडीने अटक करून कडक कारवाई करू, असे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -