घरमहाराष्ट्रनाशिकमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; १२ जणांवर गुन्हा दाखल

नाशिकमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; १२ जणांवर गुन्हा दाखल

Subscribe

नाशिक शहर पोलिसांच्या पथकाने मालेगाव स्टॅण्ड येथील कपिल जाधव यांच्या मालकीच्या बंदिस्त खोलीत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला.

नाशिक शहर पोलिसांच्या पथकाने आज, गुरुवारी दुपारी १२.१५ वाजता मालेगाव स्टॅण्ड येथील कपिल जाधव यांच्या मालकीच्या बंदिस्त खोलीत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या ठिकाणी बेकायदा जुगार खेळवताना व जुगार खेळणार्‍या अशा एकूण १२ जणांवर पथकाने पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पथक गठीत केले आहे. पथकाकडून दररोप छापासत्र आहे. त्यामुळे जुगारअड्डाचालकांचे धाबे दणाणले आहेत. मालेगाव स्टॅण्ड, भारत मशिनरीशेजारी दिशान चायनीजच्या बेसमेंटमध्ये कपिल जाधव यांच्या मालकीच्या बंदिस्त खोलीत अवैध जुगार चालू असल्याची माहिती शहर पोलिसांच्या पथकास मिळाली. त्यानुसार पथकाने आज, गुरुवारी दुपारी जाधवांच्या बंदिस्त खोलीत छापा टाकला. मालक कपिल जाधव, नाशीर हुसेन शेख (४५, रा. गंजमाळ, नाशिक), नितीन शामराव अटक (३८, रा. नाशिक), रमेश नागु कुर्‍हाडे (४०, रा. देवळाली कॅम्प) हे जुगार खेळविताना आढळून आले. तर संजय रमन कांबळे (३५, रा. पंचवटी), जितेंद्र आण्णा कांबळे (४८, रा. पंचवटी), बाळू बाबुराव साठे (४६, रा.पंचवटी), अनिकेत आनंद अभ्यंकर (२४, रा.रविवार कारंजा), संदीप शंकरलाल चांडक (४२, रा. पंचवटी), देविदास मोतीराम पाटील (४५), राकेश सुरेश करमचंदानी (२९, रा. म्हसरुळ), राम अनिल घोडके (३१, पंचवटी) यांना जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून पोलिसांनी ३३ हजार १५० रुपये, तीन कॅलक्युलेटर, तीन पेन, तीन मटका पुस्तके जप्त केली आहेत. त्यांच्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

काँग्रेस-राष्ट्रवादीचे एकमत आता शिवसेनेशी बोलू – पृथ्वीराज चव्हाण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -