घरमहाराष्ट्रकाँग्रेस-राष्ट्रवादीचे एकमत आता शिवसेनेशी बोलू - पृथ्वीराज चव्हाण

काँग्रेस-राष्ट्रवादीचे एकमत आता शिवसेनेशी बोलू – पृथ्वीराज चव्हाण

Subscribe

‘महाराष्ट्रात पर्यायी सरकार स्थापन करण्याबाबत राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. आता यापुढील चर्चा महाआघाडीच्या इतर घटकपक्षांसोबत करु त्यानंतर आम्ही शिवसेनेशी चर्चा करु. या बैठकींमध्ये एकमत झाल्यानंतर आम्ही अधिकृत याबाबत घोषणा करु’, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. दिल्लीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण या दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.


हेही वाचा – ठरलं एकदाचं; महाविकासआघाडीत सत्तेचे वाटप असे होणार

- Advertisement -

नेमके काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?

‘महाराष्ट्रात पर्यायी सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आज दोन्ही पक्षांची दुसरी बैठक झाली. त्यामध्ये आमचे पूर्ण एकमत झाले असून उद्या आम्ही मुंबईत जाणार आहोत. तिथे आमच्या आघाडीतील इतर घटकपक्षांशी चर्चा करु. त्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची नेते शिवसेनेसोबत सत्ता स्थापनाच्या फॉर्म्युला संदर्भात चर्चा करतील. या चर्चेत एकमत झाल्यानंतर आम्ही संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती देऊ’, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

दिल्लीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकांचे सत्र संपल्याची शक्यता

बुधवारी राजधानी दिल्लीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्ली येथील ‘६ जनपत’ या निवासस्थानी सुमारे सहा तास बैठक झाली. या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर दोन्ही पक्षाच्या नेत्यांचे एकमत झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर आज सकाळी दहा वाजता काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर पुन्हा राष्ट्रवादी-काँग्रेस नेत्यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीनंतर नवाब मलिक आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आता पुढील बैठका मुंबईत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -