घरमहाराष्ट्रपुणे जमीन प्रकरण : मीरा बोरवणकरांनी केलेल्या आरोपांबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे कानावर हात,...

पुणे जमीन प्रकरण : मीरा बोरवणकरांनी केलेल्या आरोपांबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे कानावर हात, वाचा सविस्तर…

Subscribe

मीरा बोरवणकर यांनी जमीन हस्तांतरणाच्या प्रकरणात नेमके का नाव घेतले हे पुस्तक वाचून सांगेन असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून सांगण्यात आले होते. ज्यामुळे आता पृथ्वीराज चव्हाण यांनी 'मॅडम कमिशनर' पुस्तकातील अजित पवारांवर आरोप करण्यात आलेले प्रकरण वाचले असून यामध्ये त्यांचे नाव का आले आहे? याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे.

मुंबई : माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकामुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. येरवडा कारागृहाच्या जमीन लिलाव प्रकरणात मीरा बोरवणकर यांनी राज्याचे आजचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. अजित पवार यांनीच येरवडा कारागृहाच्या जमीन लिलावाचा आग्रह धरला होता आणि ती जमीन तेव्हा त्यांनी 2जी घोटाळ्यातील सीबीआयने अटक केलेला बिल्डर शाहिद बालवा याला देण्यास सांगितली होती, असे मीरा बोरवणकर यांच्याकडून सोमवारी (ता. 16 ऑक्टोबर) झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेत बोरवणकर यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेही नाव घेतले आहे. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Prithviraj Chavan’s hand on the ear regarding the allegations made by Meera Borwankar)

हेही वाचा – “हिंमत असेल तर त्या दोन मंत्र्यांची चौकशी करा…” संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना आव्हान

- Advertisement -

परंतु मीरा बोरवणकर यांनी जमीन हस्तांतरणाच्या प्रकरणात नेमके का नाव घेतले हे पुस्तक वाचून सांगेन असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून सांगण्यात आले होते. ज्यामुळे आता पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘मॅडम कमिशनर’ पुस्तकातील अजित पवारांवर आरोप करण्यात आलेले प्रकरण वाचले असून यामध्ये त्यांचे नाव का आले आहे? याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये पॉलिटिकल कम्पलशन हा शब्द वापरला आहे. तो शब्द माझ्या तोंडी घातलेला आहे, अशी माहिती चव्हाण यांच्याकडून देण्यात आली आहे.

तर, जेव्हा आघाडीकडून सरकार चालवतो, तेव्हा महत्त्वाचे निर्णय हे समन्वयाने होत असतात. त्यामुळे समन्वयामध्ये जे मला पाहिजे तोच निर्णय होईल, असे होत नाही. त्यामुळे त्यावेळी त्या निर्णयातून त्यांना म्हणजेच मीरा बोरवणकर यांना ते पद देता येणार नाही, असे गृहमंत्र्यांनी सांगितले होते. पण नंतर पुन्हा माझ्या कार्यालयाने त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा तुम्हाला दुसरे काही हवे आहे का? असे सांगितले तेव्हा त्यांनी दुसरे पद रिक्त असल्याचे सांगितले. त्यावेळी पुण्यातील डीजी प्रेझेंसचे पद रिक्त असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी ते नंतर स्विकारले. असा त्या पुस्तकात उल्लेख आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून स्पष्ट सांगण्यात आले.

- Advertisement -

तसेच, त्या पुस्तकामध्ये त्यांनी असा आरोप केलेला दिसतो की, मी त्या जमीन हस्तांतरणाला विरोध केल्याने त्या आकसापोटी त्यांना ते पद दिले गेले. हा त्यांचा ग्रह आहे. त्यामुळे या प्रकरणातील खरे खोटे करण्यासाठी गृहमंत्री नाही ज्यामुळे त्यांच्यावतीने मी बोलू शकत नाही किंवा उपमुख्यमंत्र्यांचा मी वकील नाही. त्यामुळे जे काही आहे, ते आधीच मीरा बोरवणकर यांनी सांगितले आहे. त्यावेळी आमच्यात वाद नव्हता. पण आघाडी सरकार असल्याने प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्यानुसार मी माझे मत तेव्हा ही मांडले होते. त्यामुळे तेव्हा मला जमीन हस्तांतरणाच्या प्रकरणाची काहीच माहिती नव्हती, असे म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी मीरा बोरवणकर यांनी जमीन हस्तांतरणाच्या प्रकरणावरून केलेल्या आरोपांवर कानावर हात ठेवण्याचे काम केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -