घरमहाराष्ट्रराज्य उत्पादन शुल्कातील 'या' अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून सुषमा अंधारेंनी शंभूराज देसाईंवर साधला निशाणा

राज्य उत्पादन शुल्कातील ‘या’ अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून सुषमा अंधारेंनी शंभूराज देसाईंवर साधला निशाणा

Subscribe

नागपूर : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरून पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचा घरपूस समाचार घेतला आहे. यावेळी सुषमा अंधारेंनी राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि ड्रग्ज प्रकरणावरून शंभूराज देसाईवर प्रश्न उपस्थित करत टीका केली आहे.

ड्रग्ज प्रकरणावर सुषमा अंधारे म्हणाले, “शंभूराज देसाई म्हणाले माफी, अशी मागणी केली आहे. तर मी कशासाठी माफी मागायची. मी तुम्हाला काही प्रश्न विचारले, आणि ठामपणे प्रश्न विचारले. पुण्यात ससूनच्या गेटवर 2 कोटींचा ड्रग्ज सापडतो. तुम्हाला यात काही चिंताजनक वाटत नाही. उत्पादन शुल्कशी संबंध असेल, तर मी तुम्हाला प्रश्न विचारेन ना. मी कृषी मंत्र्याला बोले का? की शिक्षण मंत्र्याला बोले का?, विषय जर राज्य उत्पादन शुल्कशी संबंधित असेल, तर मी तुम्हाला प्रश्न विचारे?, असे म्हणत शंभूराज देसाईंवर टीका केली आहे. सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, “तुम्हाला काहीच वाट नाही का? नाशिकमध्ये 200 ते 300 कोटीचा ड्रग्जचा कारखाना उभा राहिला. राज्य उत्पादन शुल्क म्हणून तुमची काही जबाबदारी येत नाही का? सोलापूरमध्ये देखील अशीच ड्रग्जची फॅक्टरी उभी राहली. तुम्हाला यात काहीच विषेश असे वाटत नाही का?, असे अनेक सवाल सुषमा अंधारे यांनी शंभूराज देसाई यांनी केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ड्रग्जच्या बाबतीत झीरो टॉलरन्स हवे; फक्त भाषण नाही तर…सुळेंचा फडणवीसांवर निशाणा

उत्पादन शुल्क मंत्री म्हणून सपशेल नापास

“नाशिकमध्ये एमडी ड्रग्ज राज्यभरात पसरविले गेले हे आम्ही माध्यमातून ऐकले. ते नाशिकमध्यून सगळीकडे पसरविले गेले. तुमचे काय दुर्लक्ष झाले होते का? जर तुमचे दुलर्क्ष झाले असेल तर माझे दोन प्रश्न आहेत. जर मला यातील काहीच माहिती नव्हते. तर तुम्ही संबंधित विभागाचे मंत्री म्हणून माझ्या शिक्षकी पेशांच्या भाषेत सपशेल नापास आहात. मग जर तुम्हाला माहिती होते. तर मग हे का झाले? दोन्ही पैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर द्यावे”, अशी मागणी सुषमा अंधारेंनी शंभूराज देसाई यांच्याकडे केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – “आम्हाला धमक्या देऊ नका, नाही तर…”, संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना इशारा

‘ही’ आहेत अधिकाऱ्यांची नावे

शंभुराज देसाई यांना उत्पादन शुल्कातील अधिकाऱ्यांच्या बद्लावरून सुषमा अंधारेंनी प्रश्न विचारले नाही. तर विधिमंडळामध्ये भाजपचे नेते प्रवीण दरेकर, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते आंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी विधिमंडळाच्या सभागृहात प्रश्न विचारले होते, अशी माहिती द्यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.

यावेळी सुषमा अंधारेंनी भाई जगताप यांनी विधिमंडळात अधिकाऱ्यांचे नाव घेतली होती. सुषमा अंधारेनी ही नावे आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत वाचून दाखवली. यावेळी सुषमा अंधारे म्हणाले, “एसआर लाड, संदीप मोरे, एसपी पाटील, पीआर तावडे, निरिक्षक नंदकुमार जाधव गेल्या 10 वर्षापासून पुण्यात कार्यरत आहेत.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -