घरमहाराष्ट्रनागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आज राज्यात 'या' ठिकाणी होणार आंदोलन

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आज राज्यात ‘या’ ठिकाणी होणार आंदोलन

Subscribe

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला दोन्ही संसदेच्या सभागृहात मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विधेयकाला मान्यता दिली. त्यामुळे या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले. यानंतर या कायद्याविरोधात ईशान्य भारतात पडसाद उमटू लागले. अनेक ठिकाणी आंदोलनाचे रुपांतर हे हिंसाचारामध्ये झाले. जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली. तसंच दिल्लीत आणि महाराष्ट्रात या कायद्याविरोधात आंदोलन केली जातं आहे. याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलन आणि मोर्चा काढणारं आहेत.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्या विरोधात ‘या’ ठिकाणी होणार आंदोलन आणि मोर्चा

मुंबईमध्ये ऑगस्टक्रांती मैदानात नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन आहे. या आंदोलनामध्ये १८ पेक्षा जास्त संघटना सामिल होणार आहे. तसंच अनेक कलाकार मंडळी देखील या आंदोलनामध्ये उपस्थित राहणार आहे.

- Advertisement -

नागपुरमध्ये भारतीय मुस्लिम परिषदेचा मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे.

अमरावतीमध्ये देखील नागरिकत्व कायद्याविरोधात मुस्लिम समाजाचा मोर्चा आहे.

- Advertisement -

जळगावात डाव्या संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यलयावर मोर्चाचं आयोजन केलं आहे.

उस्मानाबाद येथे ‘टीस’च्या विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडलं आहे.

मनमाडमध्ये मुस्लिम संघटनांचं या कायद्याविरोधात आंदोलन होणार आहे.

तसंच मालेगावमध्ये बंद पुकरण्यात आला आहे.


हेही वाचा – नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून विधानसभेत गदारोळ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -