घरताज्या घडामोडीमुलाच्या मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी आईचे योगींना आवाहन, शवविच्छेदनासाठी पाठवला मृतदेह

मुलाच्या मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी आईचे योगींना आवाहन, शवविच्छेदनासाठी पाठवला मृतदेह

Subscribe

कानपूरमधील बिथूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरामाऊ येथे धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांच्या बंदोबस्तात
वसीम मोहम्मदचा मृतदेह नरामाऊ स्मशानभूमीतून बाहेर काढण्यात आला असून शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह पाठवण्यात आला आहे. मुलाचा मृतदेह बाहेर काढताना पाहून नातेवाईकांनी आक्रोश केला. दरम्यान, मुलाच्या मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी त्याच्या आईने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आवाहन केलं आहे.

आई रोशन जहाँ यांनी मुख्यमंत्र्यांच्या पोर्टलवर तक्रार केली होती. वडील सईद मोहम्मद यांनी कानपूर जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती आणि मुलाच्या मृत्यूचे खरे कारण जाणून घेण्यासाठी मृतदेह स्मशानामधून काढून पोस्टमार्टम करण्याची मागणी केली होती. आज दुपारी, ACM III GN सरोज आणि ACP कल्याणपूर विकास कुमार पांडे, बिथूर चौबेपूर मानधना पोलिसांच्या उपस्थितीत, मृतदेह स्मशान भूमितून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

- Advertisement -

सईद मोहम्मद यांचा मोठा मुलगा वसीम मोहम्मद (25) हा 30 जानेवारी रोजी पत्नी शहनाजसोबत लग्न समारंभासाठी लादुआपूर डेरापूर कानपूर ग्रामीण भागात गेला होता. सायंकाळी घरी परतत असताना चौबेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विरोहा गावाजवळ वसीम जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेला आढळून आला, तर पत्नी शहनाज अर्धवट बेशुद्धावस्थेत आढळून आली. त्याचवेळी भटक्या जनावराने दुचाकीला धडक दिल्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली होती.

वसीमच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याचे पत्नी शहनाजने सांगितले होते. उपचारासाठी नगरला नेत असताना वसीमचा मृत्यू झाला होता. त्यानंतर नातेवाईकांनी शवविच्छेदन न करता मृतदेह पुरला. सोमवारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात मृतदेह स्मशान भूमितून बाहेर काढला असता, ते पाहून नातेवाईकांना रडू कोसळले. पोलीस ठाण्याचे प्रभारी अतुल कुमार सिंह यांनी सांगितले की, एसीएमच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

- Advertisement -

हेही वाचा : बलात्कार पीडितेच्या दाव्याने न्यायालयही चक्रावले; वकील तपासणार सत्य


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -