घरताज्या घडामोडीकोरोनाग्रस्त महिलेचा रुग्णालयातून पळ; सुरक्षा भिंतीवरुन मारली उडी

कोरोनाग्रस्त महिलेचा रुग्णालयातून पळ; सुरक्षा भिंतीवरुन मारली उडी

Subscribe

कोरोनाग्रस्त महिलेने रुग्णालयातून पळ काढल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.

कोरोनाग्रस्त महिलेने रुग्णालयातून पळ काढल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. पुण्याच्या तळेगावमध्ये एका ४५ वर्षीय कोरोनाग्रस्त महिलेने रुग्णालयातून पळ काढल्याचे समोर आले आहे. ही घटना बुधवारी संध्याकाळच्या सुमारास घडली असून दीड तासानंतर तिला ताब्यात घेण्यात यश आले आहे आणि पुन्हा कोविड सेंटरमध्ये दाखल केले आहे.

नेमके काय घडले?

तळेगावमध्ये एका ४५ वर्षीय महिलेचा ३ जुलै रोजी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर तिला मायमर वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. या कोविड सेंटरच्या दुसऱ्या मजल्यावर तिच्यावर उपचार सुरु होते. अचानक बुधावारी सायंकाळी ही कोरोनाग्रस्त महिला वैद्यकीय प्रशासनाची नजर चुकवत तळमजल्यावर आली. पण, गेटवर सुरक्षारक्षण असल्याचे तिने उडी मारुन जाण्याचे ठरवले. त्याप्रमाणे या महिलेने तीन फुटी सुरक्षा भिंतीवरुन उडी घेत त्या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला. ही बाब सुरक्षारक्षकांनी रुग्णालय प्रशासनाला सांगेपर्यंत ती नजरेआड झाली.

- Advertisement -

दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. तोपर्यंत या महिलेने कोविड सेंटरपासून साधारण अडीच किलोमीटर अंतर कापले आणि नवीन बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत जाऊन बसली. हे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलीस आपल्या दिशेने येत असल्याचे पाहिल्यानंतर महिलेने पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली.

तितक्यात रुग्णालय प्रशासन रुग्णवाहिका घेऊन तिथे पोहोचले आणि पीपीई किट घालून आलेले कर्मचारी रुग्णवाहिकेतून खाली उतरले. या कर्मचाऱ्यांनी त्या महिलेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिला कोणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. बघता-बघता तासभर उलटला होता. मग, काही स्थानिकांनी तिला बोलण्यात गुंतवले आणि कर्मचारी इमारतीच्या मागून येऊन महिलेला ताब्यात घेतले.

- Advertisement -

हेही वाचा – आजाराने ग्रासलेल्या २० वर्षीय रुग्णाची केईएम रुग्णालयात आत्महत्या


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -