घरमहाराष्ट्रपुणे कालवा फुटीप्रकरणी अहवाल १५ डिसेंबरपर्यंत!

पुणे कालवा फुटीप्रकरणी अहवाल १५ डिसेंबरपर्यंत!

Subscribe

कालवा फुटीप्रकरणी समिती १५ डिसेंबरपर्यंत अहवाल देणार - विजय शिवतारे

खडकवासला प्रकल्पाच्या नवीन मूठा उजवा कालवा फुटीप्रकरणी मुख्य अभियंता स्थापत्य (जलविद्युत व गुण नियंत्रण) पुणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. पाच सदस्यीय ही उच्चस्तरीय चौकशी समिती १५
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील मूठा उजवा कालवा फूटीप्रकरणी लक्षवेधी मांडली होती. यावर उत्तर देताना शिवतारे बोलत होते. कालवाफुटी नंतर अनेक कुटुंबे बाधित झाली असून, यापैकी ९० घरे पुर्णतः व ६५० घरांचे अंशतः नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. शासनाने विशेष बाब म्हणून बाधित झालेल्या आपदग्रस्तांना मदतीचे वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी पुणे यांना ३ कोटी रुपये मंजूर केले असल्याचे  शिवतारे यांनी यावेळी सांगितले. कालवा फुटी झाल्यानंतर तत्काळ खडकवासला धरणातून सोडला जाणारा विसर्ग बंद करण्यात आला. तात्काळ मदत व पुनर्वसन विभाग व महानगरपालिकेमार्फत मदत व बचावकार्य करण्यात आल्याचे शिवतारे यांनी यावेळी सांगितले.

कालवा फुटल्याप्रकरणी केबल कंपन्यांनाही नोटीसा

पुणे कालवा फुटल्या प्रकरणी केबल कंपन्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या केबल कंपन्यांनी कालव्याशेजारी अनधिकृतपणे केबल्स टाकल्या होत्या. या कंपन्यांच्याविरोधात ग्राहकांनी तक्रार दाखल केली होती. कालवा फुटल्याप्रकरणी जलसंपदा विभागाने अनधिकृत केबल टाकलेल्या सर्व केबल कंपन्यांना नोटीसा बजावल्या आहेत. कंपन्यांची माहिती गोळा करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती जलसंपदा विभागाची दिली आहे.

काय होती नेमकी घटना? 

पुण्यामध्ये २७ सप्टेंबरला खडकवासला धरणातून पुणे शहराला आणि जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारा मुठा नदीचा उजवा कालवा फुटला होता. सिंहगड रस्त्यावर दांडेकर पुजाजवळ ही घटना घडली. सकाळी सव्वा अकराच्या दरम्यान कालवा फुटला त्यानंतर दांडेकर पूल परिसरामध्ये पाणीच पाणी झाले होते. दांडेकर पूल परिसरातील रस्त्यांला नदीचे स्वरूप आले होते. कालवा फुटल्याने रस्त्यावरील अनेक वाहने वाहून गेली होती. तसंच झोपडपट्टी परिसरामध्ये मोठ्याप्रमाणात पाणी शिरल्याने नागरिकांच्या घरातील सामान वाहून गेले आणि घरांचे नुकसान झाले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -