घरमहाराष्ट्रDJ लावून दणक्यात केलं लग्न; वधू-वराच्या आईवडिलांसह वऱ्हाडींवर गुन्हा दाखल

DJ लावून दणक्यात केलं लग्न; वधू-वराच्या आईवडिलांसह वऱ्हाडींवर गुन्हा दाखल

Subscribe

लॉकडाऊनदरम्यान नियमांचे पालन न केल्याने हा विवाह सोहळा चांगलाच महागात पडला

देशभरात कोरोनाचा कहर सुरू असताना सार्वजनिक कार्यक्रम, धार्मिक सोहळ्यांवर बंदी घातली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपुर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर आता त्या नियमात शिथिलता आणल्याने पुन्हा एकदा महाराष्ट्र पुर्वपदावर येऊ लागला आहे. असे असले तरी राज्यात ५० जणांच्या उपस्थितीत लग्न सोहळे पार पाडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मात्र, लॉकडाऊनदरम्यान नियमांचे पालन न केल्याने हा विवाह सोहळा चांगलाच महागात पडला आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील मोराची-चिंचोली गावात घडली आहे. सर्वात जास्त मोरांची संख्या असलेल्या शांतता प्रिय गावात डीजेच्या तालावर कर्कश आवाजात वऱ्हाडी मंडळींसह नवरा त्यांच्या मित्रमंडळींना घेऊन थिरकला परंतु नियमांच्या विरोधात.

- Advertisement -

हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलिसांना हा सर्व प्रकार समजला. त्यानंतर पोलिसांनी नवरा-नवरीच्या आई-वडिलांसह २० ते २५ वऱ्हाडी मंडळी वर गुन्हा दाखल केला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये नवरदेवासह ही मंडळी डिजेच्या तालावर थिरकताना दिसतेय. तर नवरदेवासह कोणीही मास्कचा वापर केला नसून सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचे दिसत आहे.

वधू-वराच्या आईवडिलांसह २० ते २५ लोकांवर गुन्हा

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, गणेश आप्पासाहेब थोपटे असे नवरदेवाचे नाव असून २५ जूनला लग्न होते. या लग्नात कोणीही मास्क न लावता, सोशल डिस्टन्सिंगचा वापर केला नाही. शिवाय कोणतेही वाद्य वाजवण्याची परवानगी घेतली नाही. याबाबत नवरा मुलगा व नवरी मुलीचे आई वडील यांच्यासह २० ते २५ लोकांच्या विरोधात शिरुर पोलिसात २६ जून रोजी गुन्हा दाखल केला असल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रात आजपासून पुन्हा सलून सुरु; ‘या’ नियमांचे करावे लागणार पालन

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -