घरमहाराष्ट्रCovid-19: पुणे विभागीय आयुक्तांना दोन महिन्यात दुसऱ्यांदा कोरोनीची लागण!

Covid-19: पुणे विभागीय आयुक्तांना दोन महिन्यात दुसऱ्यांदा कोरोनीची लागण!

Subscribe

सौरभ राव यांचं लसीकरण पूर्ण, पण रिपोर्ट पॉझिटिव्ह

राज्यात कोरोनाचा कहर अद्याप सुरू असून मुंबई, नाशिक आणि पुणे या सारख्या मोठ्या शहरात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत पुण्यातून आश्चर्य वाटावं अशी बातमी समोर आली आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे, तर गेल्या दोन महिन्यांपूर्वी राव यांना पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली होती. सौरभ राव यांचं लसीकरण पूर्ण झाले असतानाही त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती मिळतेय.

वर्षभऱ कोरोना रुग्णांची सेवा केल्यानंतर १६ मार्च रोजी सौरभ राव यांना कोरोनाची बाधा झाली. कोरोना लसीकरणाचा पहिला डोस घेतल्यानंतर राव यांना हा कोरोनाचा संसर्ग झाला होता. पहिल्यांदा कोरोनाची लागण झाल्याने कोरोनाचा दुसरा डोस घेण्यास उशीर झाला

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक झाल्यानंतर राव यांनी लसीचा दुसरा डोस घेतला. सौरभ राव यांनी कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस घेतल्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला. यानंतर त्यांनी पुन्हा कोरोना टेस्ट केली. या टेस्टचा रिपोर्ट सोमवार पॉझिटिव्ह आला. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे देशात सुरू असलेल्या कोरोना लसीकरण मोहीमेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होताना दिसतेय.

पुण्यातील पिंपरी-चिंचवड शहरातही कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. सोमवारी पिंपरी चिंचवडमध्ये ८४६ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर २,०६७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत शहरातील ३,६९३ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या शहरात कोरोनाचे १६,५६१ सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी ११,४८२ रुग्ण होम क्वारंटाईन असून ५.०९७ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -