घरताज्या घडामोडीPune News : शिप मॅनेजमेंट कंपनीत काम करणारा प्रणव कराड अमेरिकेतून बेपत्ता,...

Pune News : शिप मॅनेजमेंट कंपनीत काम करणारा प्रणव कराड अमेरिकेतून बेपत्ता, पुण्याचा आहे रहिवाशी

Subscribe

विल्समन शिप मॅनेजमेंट प्रायवेट लिमिटेड या अमेरिकेतील कंपनीत काम करणारा पुण्याचा रहिवाशी बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. प्रणव कराड असे या मुलाचे नाव आहे.

पुणे : विल्समन शिप मॅनेजमेंट प्रायवेट लिमिटेड या अमेरिकेतील कंपनीत काम करणारा पुण्याचा रहिवाशी बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. प्रणव कराड असे या मुलाचे नाव आहे. मागील तीन दिवसंपासून प्रणव बेपत्ता आहे. याप्रकरणी प्रणवचे वडील गोपाळ कराड यांनी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (Pune News Pranav Karad who works in a ship management company is missing from America a resident of Pune)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील रहिवाशी असलेला प्रणव हा कामासाठी अमेरिकेत गेला होता. अमेरिकेतील विल्समन शिप मॅनेजमेंट प्रायवेट लिमिटेड या कंपनीत प्रणव काम करत होता. विल्समन शिप मॅनेजमेंट प्रायवेट लिमिटेड या कंपनीत प्रणव हा शिफ्ट डेस्कला काम करत होता.

- Advertisement -

अमेरिकेत जहाजावर काम करत असलेला प्रणव अचानक बेपत्ता झाल्याने त्याचे कुटुंबीय फार चिंतेत आहेत. गेल्या ३ दिवसांपासून प्रणव बेपत्ता असल्याचे त्याच्या वडील गोपाळ कराड यांनी सांगितले. प्रणव बेपत्ता झाल्याची माहिती समोर येताच मुंबईतल्या कंपनीने प्रणवचा शोध सुरू केला आहे. मात्र अद्याप मुंबईतील कंपनीने कोणतीही समाधानकारक माहिती दिली नसल्याची माहिती प्रणवच्या वडिलांनी दिली.

हेही वाचा – Pune Crime : पुण्यात माणुसकीला काळिमा; पत्नीच्या मदतीने 19 वर्षीय तरुणीवर पतीचा बलात्काराचा प्रयत्न

- Advertisement -

मुलगा बेपत्ता झाल्याचे समजताच वडील गोपाळ कराड यांनी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावेळी तक्रार दाखल करताना प्रणवच्या वडिलांनी माझा मुलगा मला परत मिळाला पाहिजे. कंपनीवाले कोणतीच माहिती व्यवस्थित देत नाही. त्यामुळे मी याप्रकरणी आता मी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, असे सांगितले.

माझा मुलगा मला परत मिळाला पाहिजे. कंपनी कोणतीही माहिती व्यवस्थित देत नाही. मी याबाबत पोलिसांत देखील तक्रार दाखल केली आहे. आमचं शोधकाम सुरू आहे, असं कंपनी म्हणत आहे. पोलिसांकडून देखील हवी तशी मदत मिळत नाही, याबाबत कराड यांनी वारजे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.


हेही वाचा – ED Pune : पुण्यातील VIPS कंपनीची 24 कोटींची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -