पुणे: दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयातून दोन महिलांना अटक

सध्या या प्रकरणाबाबत अधिक तपास सुरू आहे.

sexual abuse of a minor boy in dharavi
संतापजनक! ८ वर्षाच्या चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार

दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यातून दोन महिलांना अटक केली आहे. रविवारी दिल्लीच्या एनआयए आणि एटीएस पथकाने पुण्यात संयुक्त कारवाई केली. पुण्यातील येरवाडा आणि कोंडवा येथून या दोन महिलांना अटक केली आहे. सादिया अनवर शेख (वय २१, रा येरवडा) आणि नाबील सिद्दिकी खत्री (वय २७, रा. कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्या आलेल्या माहिलांची नावे आहेत.

इस्लामिक स्टेट खुरासान प्रांत (ISIK) या दहशतवादी संघटनेशी सादिया अनवर शेख आणि नाबील सिद्दिकी खत्री यांचा संबंध असल्याचा संशय आहे. यामुळेच या पुण्यातील दोन माहिलांना अटक करण्यात आली आहे. या दोघीही दहशतवादी संघटनेसाठी काम करत होत्या. तसेच त्या सध्या सक्रीय होत्या, असा संशय आहे. याबाबतची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. सध्या या प्रकरणाबाबत अधिक तपास सुरू आहे.


हेही वाचा – अपहरण झालेल्या ‘त्या’ चार मुलींची नवी मुंबई पोलिसांकडून सुटका