घरताज्या घडामोडीसामनगावात बिबट्या जेरबंद

सामनगावात बिबट्या जेरबंद

Subscribe

नाशिकरोड : दारणा नदी काठच्या गावात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात सोमवारी (दि.१३) सकाळी बिबट्या जेरबंद झाला. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी पिंजरा ताब्यात घेतला आहे.

गेल्या महिन्यात सामनगाव येथील पोलीस पाटील बबन जगताप यांच्या नातवावर बिबट्याने हल्ला करुन गंभीर जखमी केले होते, त्यानंतर वनविभागाचे परिक्षेत्र अधिकारी विवेक भदाने, मधुकर गोसावी यांच्यासह पथकाने पहाणी करत बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावले होते. अखेर सोमवारी सकाळी सामनगावच्या विरु बाबा मळ्याच्या परिसरातील अमोल जगताप यांच्या शेताला लागून नाल्याजवळ लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याचे नागरिकांच्या लक्षात येताच बिबट्याला पहाण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. वनविभागाच्या नाशिक परिक्षेत्र फिरत्या पथकाचे पवार, मधुकर गोसावी, अनिल अहिरराव, गोविंद पंढरे, विजय पाटील, आदींनी पिंजरा ताब्यात घेत नाशिकच्या रोपवाटीकेत ठेवण्यात आले असून गंगापूर येथील रोपवाटीकेत ठेवण्यात येणार आहे. मंगळवारी (दि.१४) बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात त्याची रवानगी करण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या वतीने नेण्यात येणार असल्याचे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -