घरमहाराष्ट्रसिंहगड : तरूणीच्या खूनाप्रकरणी तिघांना पोलीस कोठडी

सिंहगड : तरूणीच्या खूनाप्रकरणी तिघांना पोलीस कोठडी

Subscribe

सिंहगड रोडवर तरूणीचा खून केल्याप्रकरणी तरूणीसह तिघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

उच्चशिक्षित तरूणीचा खून केल्याप्रकरणी सिंहगडरोड पोलिसांनी तरूणीसह तिघांना अटक केली. त्या तिघांना १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
तेजसा श्‍यामराव पायाळ (२९) ही तरुणी सिंहगडरोड परिसरात २ डिसेंबर, सोमवारी मृतावस्थेत आढळून आली होती. त्यावेळी संपूर्ण शहरात खळबड उडाली होती. शवविच्छेदन अहवाल आणि पोलिसांनी केलेल्या तपासात तिचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नेमके काय घडेल?

सिंहगड रोडवर तरूणीचा खून प्रकरणी सहकारनगर, तुळशीबागवाले कॉलनी येथे राहणारा पियुष नितीन संचेती (३४), बेंगलोर येथे राहणारा वसंतकुमार प्रभाकर गौडा (३१) आणि आंबेगाव बुद्रुक येथे राहणारा सोनल सुनील सदरे (२९) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. सहायक पोलीस निरीक्षक सतिश उमरे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तिघांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी सहायक सरकारी वकील राजश्री कदम यांनी तिघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. घटनेच्यास्थळी तिघे उपस्थित असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. दरम्यान, तिघांकडून सांगण्यात येणाऱ्या कथनामध्ये विभिन्नता असून याबाबत अधिक तपास करण्यासाठी तिघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी अॅड. कदम यांनी केली आहे. ती न्यायालयाने ग्राह्य धरत वरील आदेश दिला.

- Advertisement -

हेही वाचा – बँकांच्या असहकारामुळे नुकसाग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचितच!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -