घरटेक-वेकभारतात नोकिया स्मार्ट टीव्ही लाँच; जाणून घ्या फीचर्स

भारतात नोकिया स्मार्ट टीव्ही लाँच; जाणून घ्या फीचर्स

Subscribe

भारतात हा स्मार्ट टीव्ही लाँच झाला असून ग्राहकांना नोकियाच्या या स्मार्ट टीव्हीमध्ये लेटेस्ट फीचर्स मिळणार

स्मार्टफोन निर्माता कंपनी नोकियाने भारतात नुकताच आपला पहिला 4k स्मार्ट टीव्ही लाँच केला आहे. १० डिसेंबरपासून हा स्मार्ट टीव्ही ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. ई-कॉमर्स साईट्स फ्लिपकार्टवर उपलब्ध असणाऱ्या सेलच्या माध्यमातून ग्राहकांना स्मार्ट टीव्हीचे फीचर्स जाणून घेऊन तो खरेदी करता येणार आहे. भारतात हा स्मार्ट टीव्ही लाँच झाला असून ग्राहकांना नोकियाच्या या स्मार्ट टीव्हीमध्ये लेटेस्ट फीचर्स मिळणार आहे.

नोकियाच्या या स्मार्ट टीव्हीची विक्री १० डिसेंबरपासून सुरू होणार असून या टीव्हीची मोटोरोला आणि वनप्लस या कंपनीच्या टीव्हीशी तगडी स्पर्धा असणार आहे.

- Advertisement -

अशी आहे नोकिया स्मार्ट टीव्हीची किंमत

कंपनीकडून ५५ इंच असणारा डिस्प्ले असणारा 4k स्मार्ट टीव्हीची किंमत ४१ हजार ९९९ रूपये इतकी आहे. ग्राहक या टीव्हीला फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकतात. ग्राहकांना या खरेदीवर १० टक्के सूट मिळणार आहे. याशिवाय टीव्ही नो कॉस्ट ईएमआयसह खरेदी करता येणार आहे.

असे आहेत फीचर्स

  • नोकियाच्या या स्मार्ट टीव्हीला ५५ इंचीचा अल्ट्रा एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • या टीव्हीचे रिझॉल्यूशन ३८४० x २१६० पिक्सल देण्यात आला आहे.
  • या टीव्हीला क्वॉडकोर चिपसेटसह २.२५ जीबी रॅमचे सपोर्ट देण्यात आले आहे.
  • हा स्मार्ट टीव्ही अन्ड्रॉईड ९ पाय ऑपरेटिंग सिस्टमवर आधारलेला आहे.

या फीचर्ससह कंपनीने उत्कृष्ट साऊंड क्वालिटी दिली असून त्यात इंटेलिजेंट डिमिंग टेक्नॉलोजी, डॉल्बी विजन आणि HDR 10 सारखे फीचर्स दिले आहेत. तसेच कंपनीकडून या स्मार्ट टीव्हीमध्ये जेबीएलची साऊंड टेक्नॉलोजी देखील वापरण्यात आली आहे. तसेच ग्राहकांना या स्मार्ट टीव्हीच्या माध्यमातून नेटफ्लिक्स, गुगल असिस्टेंट आणि युट्यूबची सुविधा मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -