घरमहाराष्ट्रपुणेPune Traffic : पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल, 'या' भागात अवजड वाहनांना बंदी

Pune Traffic : पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल, ‘या’ भागात अवजड वाहनांना बंदी

Subscribe

पुणे : पुण्यात नेहमीच वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यातही पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरांमध्ये मेट्रोची कामे सुरू असल्याने तेथील नागरिकांसाठी वाहतूक कोंडीची समस्या हा विषय गंभीर बनला आहे. त्यामुळे आता पुणे वाहतूक पोलिसांकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये येणाऱ्या अनेक अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. (Pune Traffic Police has banned heavy vehicles in Pune, Pimpri Chinchwad)

हेही वाचा… Latur Accident : देवदर्शनासाठी निघालेल्या 4 मित्रांवर काळाचा घाला; भीषण अपघातात मृत्यू

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड, मुंबई ,सातारा ,सोलापूर या शहरातून पुण्यात येणाऱ्या अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे अवजड वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा अशा सूचना पुणे पोलीस प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. पुण्यातून बाहेर पडण्यासाठी जड वाहनांना आता पर्यायी मार्ग वापरावा लागणार आहे. प्रवेश बंदी असल्याने वाहन चालकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर दंड अथवा कारवाई करण्यात येईल अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग कोणते?

पुणे-नगर ,पुणे-सोलापूर, पिंपरी चिंचवड-पुणे शहर या मुख्य मार्गांवर जड वाहनांना पूर्णपणे बंदी लावण्यात आली आहे. वाघोली ते पुणे शहराच्या दिशेने जड वाहनांना 24 तास प्रवेश करता येणार नाही. याऐवजी शिक्रापूरहून चाकण मार्गे पिंपरी चिंचवड आणि तळेगाव दाभाडे मार्गे मुंबई आणि अहमदनगरकडे जड वाहनांना जाता येणार आहे, असे पुणे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. परंतु, ही अवजड वाहनांवर नेमके किती दिवस ही बंदी घालण्यात आली आहे, याबाबतचे स्पष्टीकरण मिळू शकलेले नाही. ज्यामुळे काही दिवसांसाठी का असेना पण पुण्यातील आणि पिंपरी चिंचवडमधील नागरिकांची वाहतूक कोंडीच्या समस्येपासून सुटका होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -