घरमहाराष्ट्रपुणे'जय-विरु' जोडीवर अजितदादांना आठवली शेतातील बैलजोडी, म्हणाले...

‘जय-विरु’ जोडीवर अजितदादांना आठवली शेतातील बैलजोडी, म्हणाले…

Subscribe

पुणे : वर्तमानपत्रात छापून आलेल्या शिवसेनेच्या जाहिरातीवरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. शिवसेना-भाजपा नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत होते. पण दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी ‘ये फेव्हिकॉल का जोड है टूटेगा नहीं’. काही लोक म्हणतात जय विरुची जोडी. पण ही जोडी युतीची आहे, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मजेशीर टोला लगावला आहे. ते म्हणाले की, आमच्या शेतात पण पूर्वीच्या काळामध्ये जोड्या असायच्या. (On the ‘Jai-Viru’ pair, Ajit Dada remembered the pair of bullocks in the field, said…)

अजित पवार म्हणाले की, पन्नास खोके एकदम ओके’ ही घोषणा सर्व दूरपर्यंत म्हणजे तळागाळापर्यंत पोहोचली आहे. परंतु काल मात्र नांदेडमध्ये भाजपचं एक पोस्टर लावलं गेलं होतं, ते सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालं आणि त्यावर पन्नास, एकशे पाच डोके म्हटलं होतं. आम्ही म्हटलं का पन्नास हे भाजपावाल्यांनी सांगितलं, एकशे पाच डोके हे भाजपवाल्यांनी सांगितलं. पण खरं तर ‘देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’ असं म्हणत भाजपवाल्यांनी शिवसेना शिंदे गटाला डिवचलं, असं माझं मत आहे. आता ते त्याच्याबद्दलचं काय समर्थन करतील हे मला माहिती नाही, पण माझा जो राजकीय अनुभव आहे, माझा जो काही राजकीय अभ्यास आहे, त्यानुसार त्यांनी डिवचलेलं आहे. आता तर भाजपावालेच शिंदे गटाच्या आमदारांना पन्नास खोके म्हणत असतील तर राज्यातल्या जनतेनं केलेल्या पन्नास खोकेच्या आरोपाला जणू एक प्रकारचा दुजोराच मिळाला असं म्हटलं तर ते काही चुकीचं ठरेल, असं मला वाटत नाही.

- Advertisement -

हेही वाचा – अधिवेशनाच्या काळामध्ये आवाज उठवणे अधिकचं सोपं जात; कथित धाडी प्रकरणी अजित पवारांची प्रतिक्रिया

आमच्या शेतात पण पूर्वीच्या काळामध्ये जोड्या असायच्या

ते आता म्हणत आहेत आमची जोडी, आमची आमक्याची जोडी, अहो तुमची कशाची जोडी. आमच्या शेतात पण पूर्वीच्या काळामध्ये जोड्या असायच्या. बैलाच्या जोड्या असायच्या, त्यावेळेस नावं पण वेगवेगळी असायची. राजा सर्जा किंवा तुम्हालाही आठवत असेल. पण त्यांच्या वक्तव्याचा आणि मी आता जे म्हणालो त्याची तुलना करतो असं अजिबात समजू नका. परंतु ते फेव्हिकॉल, जय विरूची जोडी वगैरे वगैरे हे सांगायची वेळ तुमच्यावर का यावी? तुम्हीच निर्माण करता, आम्ही प्रश्न निर्माण केला का? आम्ही त्याच्याबद्दल कुठली भूमिका घेतली का? करोडो रुपयाच्या जाहिराती पहिल्या पानावर तुम्ही देता? ती जाहिरात कुठंतरी काहींना खटकते. त्याच्याबद्दल आम्हाला असं वाटतं की, त्या जाहिरातीमध्ये हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो किंवा आनंद दिघेजींचा फोटो नाही. कारण यांची नावं घेऊन ते सत्तेवर आलेले आहेत. मग काहीजण म्हणतात ते आमच्या हृदयात आहेत. मग हृदयात होते तर दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये का आले? मला प्रश्न विचारायचा आम्हाला अधिकार आहे. मग तुम्हीच एक सांगता, तुम्हीच काही चुका करता, तुम्हीच त्याच्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करताय. हे जे काही नौटंकी चालली, त्याचं काही घेणं देणं जनतेला नाही आहे, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -